फोटो सौजन्य- pinterest
ऑक्टोबरचा हा आठवडा खूप खास असणार आहे. या आठवड्यात ग्रहांच्या हालचालीनुसार काही राशीच्या लोकांसाठी विशेष फायदा होणार आहे. तर काही राशीच्या लोकांसाठी हा आठवड्यात सावधगिरी बाळगावी. हा काळ बदल आणि नवीन संधी घेऊन येईल. याचा व्यक्तीच्या प्रत्येक जीवनाच्या पैलूंवर प्रभाव पडताना दिसून येतो. या आठवड्यामध्ये कामात नवीन ऊर्जा आणि उत्साहाने पुढे जावे लागेल, परंतु काही राशींना अनावश्यक वाद आणि गुंतागुंत टाळण्याचा सल्ला दिला जातो. या काळात आर्थिक बाबी, आरोग्य आणि नातेसंबंधांमध्ये संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे असेल.
त्याचप्रमाणे आठवड्याच्या सुरुवातीलाच पहिल्या दिवशी नरक चतुर्दशी आहे. या आठवड्यात दिवाळीचा पाच दिवस साजरा केला जाणार आहे. या काळात काही राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल. मेष ते मीन राशीपर्यंच्या लोकांसाठी हा आठवडा कसा राहील, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित राहील. या आठवड्यात कोणत्याही कामात निष्काळजीपणा टाळावा, अन्यथा तुम्हाला आर्थिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तसेच या काळात तुम्हाला आरोग्य आणि नातेसंबंधाकडे विशेष लक्ष द्यायला लागेल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा आरामदायी असेल. तसेच व्यवसायाशी संबंधित समस्या या आठवड्यात दूर होतील.
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित राहील. या आठवड्यात तुम्ही लांब पल्ल्याचा प्रवास करु शकता. प्रवास करताना तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष द्या. प्रवास थकवणारा आणि अपेक्षेपेक्षा कमी फायदेशीर राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही अडचणी येऊ शकतात. शिक्षण घेणाऱ्यांना चांगल्या बातमीसाठी जास्त वेळ वाट पहावी लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना या आठवड्यात संधी मिळू शकते.
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. आठवड्याच्या सुरुवातीला दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. तुमच्या पालकांकडून तुम्हाला पाठिंबा मिळत राहील. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल.
कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. तुमची नियोजित कामे वेळेवर आणि इच्छित पद्धतीने पूर्ण होतील. तुम्हाला व्यवसायात लक्षणीय नफा होईल. या आठवड्यात महत्त्वाची प्रलंबित कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी हा काळ शुभ राहील. तुम्ही नवीन मालमत्ता, वाहने इत्यादी खरेदी करू शकता.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप फायदेशीर राहील. या आठवड्यात तुम्हाला तुमची कामे अत्यंत सावधगिरीने करावी लागतील. तुम्हाला लहान कामे पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागू शकतात. नोकरीत असलेल्यांची अनपेक्षित ठिकाणी बदली होऊ शकते. व्यवसायात पैसे गुंतवण्यासाठी हा काळ खूप चांगला राहील.
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. तुम्ही चैनीच्या वस्तूंवर पैसे खर्च कराल. घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. आरोग्य सामान्य राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. जमीन, इमारती किंवा वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद चर्चेद्वारे सोडवले जातील.
तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्साहाचा राहील. तुम्हाला तुमच्या कामात अत्यंत काळजी घ्यावी लागेल. नोकरी करणाऱ्यांनी त्यांच्या विरोधकांशी वाद घालण्यापेक्षा त्यांच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करणे चांगले. कामावर असो वा घरी, छोट्या छोट्या गोष्टींना महत्त्व देऊ नका. व्यवसायामध्ये तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकता. आरोग्याची काळजी घ्यावी
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फायदेशीर राहील. तुमचे शब्द आणि वर्तन सर्वात कठीण कामांनाही सोपे बनवेल. तुम्हाला देश-विदेशातील लोकांकडून उदार पाठिंबा आणि सहकार्य मिळेल. तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल. तुमचे आरोग्य आणि नातेसंबंध पूर्णपणे अनुकूल राहतील.
धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित राहील. तुम्हाला यश आणि समृद्धी मिळेल. अनपेक्षितपणे उद्भवणाऱ्या कोणत्याही मोठ्या समस्यांसाठी तुम्हाला तयार राहावे लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहावे. लांब पल्ल्याचा प्रवास शक्य आहे. जमीन, वाहने, इमारती इत्यादी खरेदी-विक्रीची शक्यता.
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित राहील. आठवड्याची सुरुवात आव्हानात्मक असेल, पण फायदेशीरही असेल. खूप मेहनत घेतल्यास तुम्हाला अपेक्षित लाभ होईल. या आठवड्यात तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. मालमत्ता खरेदी किंवा विक्रीसाठी हा काळ अनुकूल राहील. वडिलोपार्जित मालमत्तेबद्दल किंवा इतर कौटुंबिक बाबींबद्दल तुमच्या पालकांशी मतभेद होऊ शकतात.
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ असणार आहे. आठवड्याची सुरुवात काही चांगल्या बातम्यांनी होईल. बेरोजगार असाल तर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार नोकरी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती राहील. खूप मेहनत घेतल्यास वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होईल. आरोग्य सामान्य राहील. आर्थिक स्थिती सामान्य राहील.
मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात लांबचा प्रवास करावा लागू शकतो. नोकरी करत असाल तर कामाच्या ठिकाणी लोकांशी समन्वय ठेवा. कामाच्या ठिकाणी परिस्थिती समाधानकारक राहील. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा आठवडा प्रतिकूल राहील. तुम्हाला किरकोळ आरोग्य समस्या येऊ शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)