Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khandoba: रविवारी खंडोबाची आराधना का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

खंडोबा हे पूजनीय आणि लोकदैवत मानले जाते. अनेक भक्त आपल्या कुलदैवत म्हणून खंडोबाची श्रद्धेने पूजा करतात. विशेषतः रविवारी खंडोबाच्या मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 08, 2026 | 09:31 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • रविवारी खंडोबाची आराधना का करतात
  • खंडोबाची आराधना करण्याचे धार्मिक महत्त्व
  • खंडोबाची पूजा रविवारी का केली जाते
 

रविवारी खंडोबाची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते. कारण रविवार हा खंडोबाचा मुख्य वार आहे. या दिवशी टाकाची (पंचकोनी चांदीचा टाक) स्वच्छता करून, भंडारा-खोबरं अर्पण करावे. ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ असा जयघोष करून पूजा केली जाते. पूजा विधीमध्ये फुले, फळे, नैवेद्य आणि आरतीचा समावेश होतो. रविवारीच खंडोबाची पूजा का केली जाते, जाणून घ्या

खंडोबाची पूजा रविवारी का केली जाते?

धार्मिक मान्यतेनुसार रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो. सूर्य हा शक्ती, तेज आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. खंडोबाला युद्धदेवतेचे स्वरूप मानले जाते, त्यामुळे सूर्याच्या दिवशी म्हणजे रविवारी त्यांची पूजा केल्यास विशेष पुण्य मिळते, अशी श्रद्धा आहे.

खंडोबा हे महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाचं कुलदैवत मानलं जातं. रविवार हा खंडोबाचा वार म्हणून अनेक ठिकाणी पाळला जातो. भक्तांच्या श्रद्धेनुसार खंडोबाची पूजा केल्याने जीवनात अनेक प्रकारचे अध्यात्मिक आणि मानसिक लाभ मिळतात. खंडोबाच्या पूजनाने संकटांपासून संरक्षण मिळते, अशी भक्तांची श्रद्धा.

zodiac sign: सर्वार्थ सिद्धि आणि अमृत सिद्धि योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा

संकटांपासून संरक्षण आणि धैर्य मिळते

भक्तांच्या मान्यतेनुसार, खंडोबा आपल्या भक्ताचं रक्षण करतो आणि अडचणीच्या काळात मार्ग दाखवतो. खंडोबाच्या कृपेने धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो. असे देखील मानले जाते. युद्धदेवतेच्या रुपात त्यांची पूजा केल्यामुळे माणसाला संकटांशी सामना करण्याची ताकद मिळते.

घरात सुख, समृद्धी आणि शांती येते

अनेक लोकांच्या विश्वासानुसार, खंडोबाची भक्ती केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती येते. काही कुटुंबामध्ये नवस केला जातो आणि इच्छा पूर्ण झाल्यावरती या देवाला नैवेद्य किंवा भंडारा देखील अर्पण केला जातो. खंडोबाची पूजा केल्याने कुलदेवतेची कृपा मिळते, असे देखील म्हटले जाते. त्यामुळे कुटुंबाचं कल्याण होतं आणि वाईट शक्तीपासून संरक्षण मिळतं.
जेजुरी खंडोबा मंदिर.

Numberlogy: मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

महाराष्ट्रातील प्रसिद्ध जेजुरी खंडोबा मंदिर येथे भक्त मोठ्या श्रद्धेने जाऊन भंडारा उधळतात आणि देवाचे आशीर्वाद घेतात. येथे अनेक भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः चंपाषष्ठी आणि रविवारी येथे मोठ्या उत्साहात पूजा आणि भंडाऱ्याचा सोहळा पाहायला मिळतो. थोडक्यात, खंडोबाच्या पूजनातून भक्तांना श्रद्धा, मानसिक समाधान धैर्य आणि देवावरचा विश्वास मिळतो, असे मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: खंडोबा कोण आहेत?

    Ans: खंडोबा हे महाराष्ट्रातील लोकप्रिय लोकदैवत मानले जाते. अनेक कुटुंबांमध्ये खंडोबा हे कुलदैवत म्हणून पूजले जातात. त्यांना भगवान शिवाचे अवतार मानले जाते.

  • Que: रविवारी खंडोबाची पूजा का केली जाते?

    Ans: धार्मिक मान्यतेनुसार रविवार हा शक्ती आणि तेजाचे प्रतीक असलेल्या सूर्यदेवाचा दिवस मानला जातो. खंडोबाला युद्धदेवतेचे रूप मानले जाते, त्यामुळे रविवारी त्यांची पूजा करणे शुभ मानले जाते.

  • Que: खंडोबाला नवस करण्याची परंपरा काय आहे?

    Ans: अनेक भक्त आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून खंडोबाला नवस करतात. इच्छा पूर्ण झाल्यावर देवाला नैवेद्य अर्पण करणे किंवा भंडारा उधळणे ही परंपरा आहे.

Web Title: Why is khandoba worshipped on sunday what is its religious significance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Budh Nakshatra Parivartan: २१ सप्टेंबरनंतर बुधाचे नक्षत्र परिवर्तन; ‘या’ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत होणार सुधारणा
1

Budh Nakshatra Parivartan: २१ सप्टेंबरनंतर बुधाचे नक्षत्र परिवर्तन; ‘या’ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत होणार सुधारणा

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Weekly Horoscope: सप्टेंबर महिन्याचा चौथा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या
3

Weekly Horoscope: सप्टेंबर महिन्याचा चौथा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

Shukra Asta 2026: 23 सप्टेंबरपासून शुक्र होणार अस्त; पुढील 37 दिवस या राशींना धन-करिअरमध्ये लाभ
4

Shukra Asta 2026: 23 सप्टेंबरपासून शुक्र होणार अस्त; पुढील 37 दिवस या राशींना धन-करिअरमध्ये लाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.