
फोटो सौजन्य- pinterest
आज शुक्रवार, 2 जानेवारीचा दिवस देवी लक्ष्मी आणि सुख-समृद्धीचा ग्रह शुक्र यांना समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार वर्षाच्या पहिल्या शुक्रवारी चंद्र वृषभ राशीपासून मिथुन राशीत संक्रमण करणार आहे. त्यासोबतच शुभ योग, रवि योग, ब्रह्म योग हे शुभ योग देखील तयार होत आहे. ज्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखी वाढले आहे. तूळ, मकर, मीन या राशीसह कोणत्या राशीच्या लोकांना शुभ योगाचा फायदा होणार आहे ते जाणून घ्या
शुक्रवारचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक राहील. कामावर आत्मविश्वासाने काम कराल. तुम्ही एखाद्या कौटुंबिक प्रकरणाची जबाबदारी घेऊ शकता, जी तुम्ही चांगल्या प्रकारे हाताळू शकाल. नोकरी करणाऱ्यांना कामामध्ये चांगले यश आणि नवीन संधी मिळतील. तुम्हाला लवकरच एखाद्या मोठ्या प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळू शकते. जर तुमचे पैसे मित्रांकडे अडकले असतील तर तुम्हाला ते परत मिळू शकतात. तुम्हाला चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची संधी देखील मिळू शकते.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला आज चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुम्ही मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कोणत्याही योजनेत पैसे गुंतवले असल्यास ते परत मिळतील. जोडीदारासोबत वेळ घालवाल. मालमत्तेच्या बाबतीमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
शुक्रवारी तूळ राशीच्या लोकांना देवी लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे संपत्ती आणि नशिबाची साथ मिळेल. व्यवसायामध्ये तुमची प्रगती होईल. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कुटुंबामध्ये चांगले यश मिळेल. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे आता पूर्ण होऊ शकतात.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. घरात अनेक अपूर्ण कामे पूर्ण करता येतील आणि वेळेनुसार पुढे जाण्याने प्रगती होईल. नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. वादविवादांपासून दूर राहा. क्षुल्लक गोष्टींमध्ये अडकू नका. नातेसंबंध चांगले राहतील. नोकरीमध्ये बदल करु इच्छिणाऱ्यांना अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला अखेर दीर्घकालीन समस्यांमधून मार्ग सापडेल.
मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस आनंदाचा राहील. तुम्हाला सोशल मीडियावर चांगली बातमी ऐकू येईल किंवा तुम्ही तिथे खूप लोकप्रिय व्हाल. तुमच्या समस्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यासोबत शेअर करा; त्यांचा सल्ला तुम्हाला अडचणींमधून बाहेर काढण्यास मदत करू शकतात. तुमची कामे वेळेवर पूर्ण होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मालमत्तेशी संबंधित कौटुंबिक वाद मिटू शकतील, ज्यामुळे सर्वांना दिलासा मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)