फोटो सौजन्य- pinterest
आज गुरुवार, 25 सप्टेंबरचा दिवस खास राहील. आज शुक्र ग्रह तूळ राशीमध्ये प्रवेश करेल. यावेळी चंद्रावर गुरु ग्रहाची दृष्टी राहील. तसेच चंद्र दुसऱ्या घरात असल्यामुळे सामयोग तयार होईल. स्वातीनंतर विशाखा नक्षत्राची युती होईल त्यामुळे रवि योग देखील तयार होईल. अशावेळी नवरात्रीतच्या चौथ्या दिवशी देवीच्या आशीर्वादाने आणि रवी योगामुळे वृषभ, कर्क, कन्या, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. गुरुवारचा दिवस या राशीच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळेल. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीतही आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायात तुम्हाला चांगले पैसे कमविता येतील. आर्थिक फायदा होण्याची शक्यता. प्रलंबित असलेले कोणतेही काम वेळेवर पूर्ण होऊ शकतात. जर तुम्हाला सरकारी कामात काही अडचणी येत असल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. मुलांच्या संबंधित तुम्हाला चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी एखादी वस्तू खरेदी करु शकता. तुम्ही वाहन खरेदी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. व्यवसायातील कोणत्याही तांत्रिक अडचणींपासून तुमची सुटका होईल. कामाशी संबंधित लहान सहली यशस्वी होतील. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्ही जोडीदारासोबत एखाद्या वस्तूंची खरेदी करु शकता.
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. करिअर आणि कमाईच्या बाबतीत आजचा दिवस चांगला राहील. उत्पन्नामध्ये अपेक्षित वाढ होईल. तुमची सरकारी कामात अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमच्या कौटुंबिक व्यवसायात तुम्हाला मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करतील.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या कारकिर्दीत नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल. बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर अपेक्षित यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. जर तुम्ही तुमच्या वडिलांकडे मदत मागितली तर तुम्हाला ती सहज मिळेल. तुम्हाला कामानिमित्त परदेशात जावे लागेल.
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला तुमच्या कामाचे अपेक्षित फळ मिळेल. तुमची अपूर्ण कामे वेळेवर पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी सततची समस्या सुटल्याने तुम्ही सुटकेचा नि:श्वास सोडाल. तुमच्या मालमत्तेशी संबंधित कोणत्याही समस्या आज दूर होतील. तुमचे आर्थिक प्रयत्नही यशस्वी होतील. तुम्हाला कठोर परिश्रमापेक्षा नशीब जास्त फायदे होतील. बचत योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला अधिक फायदे होतील. व्यवसायामध्ये तुम्ही घेतलेले कर्ज तुम्हाला परत मिळू शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)