फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार, देवांचा गुरू बृहस्पति, विशिष्ट कालावधीनंतर राशी बदलतो त्याचा परिणाम 12 राशीच्या लोकांवर विविध प्रकारे होताना दिसून येतो. यावेळी बृहस्पति गुरु देव मिथुन राशीमध्ये विराजमान आहे. या वर्षी तो याच राशीत राहील. अशा वेळी कोणत्या ना कोणत्या ग्रहांसोबत युती करुन युती किंवा दृष्टी टाकत राहील ज्यामुळे शुभ अशुभ योग तयार होतील. अशा वेळी शारदीय नवरात्रीच्या वेळी देवतांचे गुरु बृहस्पतिसोबत गुरु शुक्रासोबत अर्धकेंद्र योग तयार करतील. ज्याचा परिणाम काही राशीच्या लोकांवर होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रानुसार, गुरुवार, 25 सप्टेंबर रोजी सकाळी 5.16 मिनिटांनी शुक्र गुरु एक दुसऱ्यासोबत 45 अंशांमध्ये असतील त्यामुळे अर्धकेंद्र योग तयार होईल. यावेळी शुक्र सिंह राशीमध्ये केतुसोबत विराजमान होतील.
या राशीच्या लोकांनी शुक्र गुरु ग्रह अर्धकेंद्र योग तयार करतील त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला अपेक्षित लाभ होऊ शकतो. या योगामध्ये ज्यावेळी गुरु ग्रह तुमच्या कुंडलीमध्ये गुरु ग्रह आहे आणि चौथ्या घरात बुध आधीच स्थित आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होताना दिसून येतील. या काळात तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. वैवाहिक जीवन चांगले राहील. जमीन, मालमत्ता आणि संपत्तीच्या बाबतीमध्ये तु्म्हाला अपेक्षित लाभ मिळू शकतात. गुरुच्या कृपेमुळे मान सन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठेमध्ये अपेक्षित वाढ होईल. ज्या लोकांना दीर्घकाळापासून नोकरीच्या समस्या आहेत त्यांच्या या काळात समस्या दूर होतील. न्यायालयीन प्रकरणांमध्ये या काळात तुम्हाला अनुकूल परिणाम होतील.
या राशीच्या लोकांसाठी बुध आणि गुरुचे अर्धकेंद्र योग फायदेशीर सिद्ध होईल. शुक्र सध्या लग्नात आहे, ज्यामुळे शुभ परिणाम मिळतील. यामुळे या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रामध्ये अपेक्षित यश मिळेल. या काळात आत्मविश्वास आणि धैर्यात लक्षणीय वाढ होईल ज्यामुळे तुम्ही मोठे निर्णय घेण्यास आणि जोखीम घेण्यास मागेपुढे पाहणार नाही. हा आत्मविश्वास तुम्हाला स्पर्धा आणि आव्हानांमध्ये विजयी करेल.
या राशीच्या लोकांमध्ये गुरु शुक्राचा अर्धकेंद्र योग खूप महत्त्वपूर्ण आणि ते शुभ ठरू शकते. हा काळ भाग्यवान आणि नवीन संधींनी भरलेला असेल. नशिबाच्या साथीमुळे दीर्घकाळापासून अडकलेली कामे हळूहळू पूर्ण होतील. या काळात निर्णय घेण्यात आणि आत्मविश्वासात वाढ होण्यास मदत होऊ शकते. या काळात तुमचे महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. या काळात तुम्ही परदेश प्रवास करु शकता. हा प्रवास फक्त आनंद आणि अनुभव नाही तर भविष्यामध्ये प्रगती आणि नवीन संधीसाठी मार्ग उपलब्ध होतो. परदेशात शिकणाऱ्यांसाठी आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)