फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची हालचाल आणि संक्रमण यामुळे विविध शुभ योग तयार होत आहे. यापैकी एक म्हणजे बुधादित्य राजयोग आहे हा राजयोग ज्योतिषशास्त्रात खूप विशेष मानला जातो. हा राजयोग ज्यावेळी एखाद्याच्या कुंडलीमध्ये तयार होतो त्यावेळी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये संपत्ती आणि सुखसोयींची कमतरता कधीही भासत नाही. हा राजयोग बुध आणि सूर्याच्या युतीने तयार होतो. प्रत्येक वेळी ऑक्टोबर महिन्यामध्ये तूळ राशीत ही युती होते. ज्यावेळी सूर्य आणि बुध दोघेही तूळ राशीमध्ये असल्यास त्याचा परिणाम 12 राशीच्या लोकांवर होताना दिसून येतो. या काळात अशा काही राशीच्या लोकांचे नशीब चमकणार आहे. ज्यामुळे त्यांना जीवनात सन्मान आणि संपत्तीची कमतरता भासणार नाही. बुधादित्य राजयोगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
मिथुन राशीमध्ये बुध आणि सूर्याच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग तयार होत आहे. हा राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. हा राजयोग तुमच्या कुंडलीच्या पाचव्या घरामध्ये होणार आहे. ज्यामुळे एक अतिशय विशेष आणि शुभ घर आहे. या घरामध्ये शिक्षण आणि संततीच्या आनंदाचे प्रतिनिधित्व करते. वैवाहिक अडचणींचा सामना करणाऱ्यांना त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. या काळात तुम्हाला जोडीदारांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तसेच अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
तूळ राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग खूप अनुकूल असणार आहे. नफ्याच्या संधी वाढतील. हा बुधादित्य राजयोग तुमच्या कुंडलीच्या पहिल्या घरात होत असल्याने लग्नात तयार होईल. यामुळे तुमचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व सुधारेल. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमची कार्यक्षमता सुधारेल. कर्जामुळे त्रस्त असलेल्यांना दिलासा मिळेल. तसेच तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. विवाहित जीवनात असलेल्यांना त्यांच्या जोडीदाराकडून चांगला पाठिंबा मिळू शकेल.
मकर राशीच्या लोकांसाठी बुधादित्य योग खूप फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या राशीच्या करिअर आणि व्यवसाय क्षेत्रात तो घडेल. म्हणूनच, जे काही महिन्यांपासून नोकरी शोधत आहेत त्यांना नवीन नोकरी मिळू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायांना वाढ आणि नफ्याच्या संधी वाढतील. मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची योजना आखणाऱ्यांनी देखील याचा विचार करावा. व्यवसायात अधिक वाढ होऊ शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)