Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pitru Paksha: पितृपक्षामधील नवमी कधी आहे? या दिवशी कोणाचे केले जाते श्राद्ध

पितृपक्षातील नवव्या दिवसाला मातृ नवमी, नौमी श्राद्ध आणि अविध्व श्राद्ध असे म्हणतात. या दिवशी श्राद्ध केल्याने त्याच्या आत्म्याला शांतीच मिळत नाही तर कुटुंबामध्ये समृद्धी आणते. कधी आहे पितृपक्षातील नवमी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 14, 2025 | 11:01 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

पितृपक्षातील नवमी तिथीला विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी कोणत्याही महिन्याच्या नवमी तिथीला मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे श्राद्ध केले जाते. यालाच अविधवा नवमी असे देखील म्हटले जाते. ही तिथी आईचे श्राद्ध करण्यासाठी देखील योग्य मानली जाते. असे म्हटले जाते की, या तिथीला श्राद्ध केल्याने कुटुंबातील मृत महिला सदस्यांच्या आत्म्याला शांती मिळते. नवमीचा दिवस त्या माता, बहिणी आणि मुलींना समर्पित आहे ज्यांचे पती जिवंत असताना निधन झाले किंवा ज्यांच्या मृत्यूची तारीख माहीत नसते. पितृपक्षातील नवमी तिथी कधी आहे आणि त्याचे महत्त्व जाणून घ्या

काय आहे नवमीचे महत्त्व

पितृपक्षात येणाऱ्या नवमी तिथीला विशेष महत्त्व आहे. या तिथीला मातृनवमी असे म्हटले जाते. यावेळी ही तिथी सोमवार, 15 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी ज्या माता, बहिणी आणि मुलींचे पती जिवंत असताना निधन झाले किंवा ज्यांची मृत्युतारीख माहीत नाही त्यांच्यासाठी हे श्राद्ध केले जाते. या तिथीला नवमी किंवा अविधवा नवमी असे देखील म्हणतात.

Sun Transit 2025: सूर्याने बदलले आपले नक्षत्र, या राशीच्या जीवनात येईल आनंदच आनंद

नवमी का आहे विशेष

मातृ नवमीच्या दिवशी केलेल्या श्राद्धामुळे कुटुंबातील मृत झालेल्या सदस्याच्या आत्म्याला शांती लाभते आणि ते प्रसन्न होतात, असे म्हटले जाते. या दिवशी केलेल्या श्राद्धामुळे वंश आणि कुलाची प्रगती होते, असे देखील म्हटले जाते. त्याचसोबत जी व्यक्ती हे श्राद्ध करते त्यांच्या जीवनामध्ये मातृत्व, स्नेह आणि आनंद कायम राहतो.

नवमीच्या दिवशी काय करावे

ज्यांचे आई वडील मृत पावले आहे त्यांचे श्राद्ध आणि तर्पण केले जाते.

ब्राह्मणांना भोजन द्या, विशेषतः ब्राह्मण पत्नीला दान द्या.

वृद्ध महिलांना भेटवस्तू देणेदेखील पुण्य मानले जाते.

पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि मातृशक्तीचे स्मरण करा.

गाय, कुत्रा, मासे, मुंग्या आणि कावळे यांना अन्न आणि पाणी अर्पण केले जाते. मान्यतेनुसार यामुळे पूर्वजांना अन्न मिळते आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते.

Pitru Paksha: पितृपक्षात घरामध्ये लावा या ठिकाणी कणकेचे दिवे, गरिबी होईल दूर आणि पूर्वज होतील प्रसन्न

मातृनवमीच्या दिवशी कोणते काम करावे

मातृ नवमीच्या दिवशी काही कामे करणे अनिवार्य मानली जातात.

कोणत्याही श्राद्धाच्या पूजेमध्ये तुळशीला विशेष महत्त्व असते. म्हणूनच मातृ नवमीच्या दिवशी तुळशीची देखील पूजा करावी.

यासोबतच पूर्वजांशी संबंधित कोणत्याही कामात तांब्याच्या भांड्यांचा वापर करा.

या काळात कोणत्याही महिलेचा अपमान करु नका. असे फक्त मातृ नवमीच्या दिवशीच नाही तर तुमच्या दैनंदिन जीवनातही करा. असे केल्याने तुम्हाला शुभ फळे मिळतील.

मातृ नवमीच्या दिवशी शक्य असल्यास गरजू विवाहित महिलांना लाल साडी, बांगड्या इत्यादी सुहासिनीच्या वस्तूंचे दान करावे.

या दरम्यान तुमच्या घरी येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला रिकाम्या हाताने पाठवू नका आणि त्यांना जेवण द्या.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Pitru paksha 2025 matra navami date inmportance and shradh vidhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2025 | 11:01 AM

Topics:  

  • dharm
  • Pitru Paksha
  • religions

संबंधित बातम्या

Sun Transit 2025: सूर्याने बदलले आपले नक्षत्र, या राशीच्या जीवनात येईल आनंदच आनंद
1

Sun Transit 2025: सूर्याने बदलले आपले नक्षत्र, या राशीच्या जीवनात येईल आनंदच आनंद

Bhadra Rajyog: 15 सप्टेंबरपासून बुध ग्रह करणार कन्या राशीत प्रवेश, भद्रा राजयोगामुळे या राशीच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ
2

Bhadra Rajyog: 15 सप्टेंबरपासून बुध ग्रह करणार कन्या राशीत प्रवेश, भद्रा राजयोगामुळे या राशीच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ

Zodiac Sign: रविवारी होणार आदित्य योगाचा लाभ, कर्क राशीसह या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब
3

Zodiac Sign: रविवारी होणार आदित्य योगाचा लाभ, कर्क राशीसह या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

Pitru Paksh 2025 : पितरांच्या शांतीसाठी आणि पिंडदानासाठी सर्वश्रेष्ठ मानली जातात ही तीर्थस्थळे; इथे जाऊनच मिळेल मोक्ष
4

Pitru Paksh 2025 : पितरांच्या शांतीसाठी आणि पिंडदानासाठी सर्वश्रेष्ठ मानली जातात ही तीर्थस्थळे; इथे जाऊनच मिळेल मोक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.