फोटो सौजन्य- pinterest
ग्रहांचा राजा सूर्य याने स्वतःच्या राशीमध्ये राहून दुपारी 3.48 वाजता उत्तराफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. हे नक्षत्र सूर्याच्या अधिपत्याखाली येत असल्याने त्याच्यातील संक्रमणाची ऊर्जा देखील जास्त शक्तिशाली असणार आहे. उत्तराफाल्गुनी नक्षत्र समृद्धी, नेतृत्व, सर्जनशीलता आणि सामाजिक प्रतिष्ठेशी संबंधित आहे. या वेळी सूर्याची स्थिती अनेक राशींच्या लोकांसाठी करिअर, आरोग्य, आत्मविश्वास आणि कौटुंबिक जीवनाच्या क्षेत्रात शुभ परिणाम देणारी राहणार आहे. या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होणार आहे, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण पाचव्या घरामध्ये होणार आहे. याचा संबंध बुद्धिमत्ता, सर्जनशीलता, शिक्षण आणि मुलांशी संबंधित आहे. या काळात कला, लेखन किंवा इतर सर्जनशील क्षेत्रात यश मिळू शकते. विद्यार्थ्यांची अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि परीक्षेत चांगले गुण मिळण्याची शक्यता असेल. करिअरमध्ये देखील या लोकांना अपेक्षित यश मिळेल. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला मुलांशी संबंधित आनंद मिळू शकतो. आरोग्य सुधारेल. खासकरुन हृदय आणि डोळ्यांच्या बाबतीत.
सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे संक्रमण तुमच्या कुंडलीमध्ये पहिल्या घरात होत आहे. ज्याचा संबंध व्यक्तिमत्व, आरोग्य आणि आत्मसन्मानाशी संबंधित आहे. सूर्य स्वतःच्या राशीत असल्याने उत्तराफाल्गुनी नक्षत्र देखील त्याच्या नियंत्रणाखाली येईल. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन उंची गाठण्याच्या संधी मिळतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकेल.
धनु राशीच्यी लोकांसाठी सूर्याचे संक्रमण तुमच्या राशीमध्ये नवव्या घरात होत आहे. ज्याचा संबंध भाग्य, धर्म, प्रवास आणि उच्च शिक्षणाशी संबंधित आहे. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. बऱ्याच काळापासून अडकलेल्या कामांमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. उच्च शिक्षण किंवा परदेश प्रवासाशी संबंधित लोकांना चांगली बातमी मिळेल. तुम्हाला करिअरमध्ये नवीन दिशा मिळेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. त्याचसोबत तुम्हाला मानसिक शांती देखील मिळेल.
मीन राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे संक्रमण तुमच्या कुंडलीमध्ये सहाव्या भावावर परिणाम करणारा राहील. ज्याचा संबंध शत्रू, रोग, स्पर्धा आणि सेवेशी संबंधित आहे. या काळात तुमच्या स्पर्धात्मक क्षमतेत वाढ दिसून येईल. नोकरी किंवा व्यवसायात स्पर्धेशी संबंधित लोकांना अपेक्षित यश मिळेल. आरोग्याशी संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळेल. या काळात विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चांगले निकाल मिळतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)