Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pradosh Vrat: जून महिन्यातील प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व

प्रदोष व्रत प्रत्येक महिन्यात दोन वेळा येते. जून महिन्यातील पहिले प्रदोष व्रत रविवार, 8 जून रोजी पाळले जाणार आहे. प्रदोष काळात संध्याकाळी पूजा करण्याची परंपरा आहे. जाणून घ्या प्रदोष व्रत कधी आहे

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 04, 2025 | 02:04 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

हिंदू पंचांगानुसार, जून महिन्यातील पहिले प्रदोष व्रत रविवार, 8 जून रोजी आहे. प्रदोष व्रत रविवारी येत असल्याने त्याला रवी प्रदोष व्रत असे म्हटले जाते. हे व्रत नेहमी त्रयोदशी तिथीला पाळले जाते. या दिवशी भगवान महादेव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार, ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला दुर्मिळ योग तयार होत आहे. या योगांमध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करून प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते.

प्रदोष व्रत शुभ मुहूर्त

ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी रविवार, 8 जून रोजी सकाळी 7.17 वाजता सुरू होईल तसेच या तिथीची समाप्ती सोमवार, 9 जून रोजी सकाळी 9.35 वाजता संपेल. अशा परिस्थितीत, या शुभ प्रसंगी, शिवपूजेचा वेळ संध्याकाळी 7.18 ते रात्री 9.19 पर्यंत असेल. उद्यतिथीनुसार हे व्रत रविवार, 8 जून रोजी पाळले जाईल.

Vastu Tips: कितीही सुंदर गोष्टी असल्या तरी कोणालाही या वस्तू देऊ नका भेट

2 शुभ योग

जून महिन्याच्या महिन्याच्या प्रदोष व्रताच्या दिवशी 2 शुभ योग तयार होत आहे. रवी प्रदोष व्रताच्या दिवशी परिघ योग आणि शिव योग तयार होत आहे. यावेळी परिघ योग सकाळपासून दुपारी 12.18 वाजेपर्यंत राहील. त्यानंतर शिव योग सुरू होईल. रवी प्रदोष व्रताची पूजा फक्त शिवयोगातच केली जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार, परिघ योगात तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळविण्यासाठी काम करू शकता. तुमच्या शत्रूंविरुद्ध तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळू शकते.

प्रदोष व्रताचे महत्त्व

प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत पाळले जाते. या दिवशी लोक उपवास करून भगवान शिवाची पूजा करण्याचे व्रत घेतात. ते विधीनुसार भगवान शिवाची पूजा करतात. शिवाच्या कृपेने व्यक्तीचे दुःख, दोष, रोग इत्यादी नष्ट होतात.

Vastu Tips: पावसाच्या पाण्याचे ‘हे’ उपाय केल्यास कर्जापासून लग्नापर्यंतच्या समस्या होतील दूर

प्रदोष व्रताच्या दिवशी या गोष्टींचे करा दान

रवि प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर दूध, दही, गंगाजल, बेलपत्र इत्यादी अर्पण करावेत. शिवलिंगावर अभिषेक केल्याने महादेवाचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात आनंद येतो, असे मानले जाते.

प्रदोष व्रताच्या दिवशी या गोष्टी करा अर्पण

भगवान शिवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी शिवलिंगावर या पवित्र वस्तू अर्पण करा. तूप, दही, फुले, फळे, तांदूळ, बेलाची पाने, धतुरा, भांग, मध, गंगाजल, पांढरे चंदन, काळे तीळ, कच्चे दूध, हिरवी मूग डाळ, शमीची पाने या गोष्टी अर्पण कराव्यात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Pradosh vrat 2025 june month shubh muhurat yoga importance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 02:04 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Lord Krishna: भगवान श्रीकृष्णांच्या मुकुटात मोरपीस का असते? जाणून घ्या पौराणिक महत्त्व
1

Lord Krishna: भगवान श्रीकृष्णांच्या मुकुटात मोरपीस का असते? जाणून घ्या पौराणिक महत्त्व

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Weekly Horoscope: जुलै महिन्याचा चौथा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या
3

Weekly Horoscope: जुलै महिन्याचा चौथा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

Jagannath Puri: श्रीजगन्नाथांच्या मूर्तींचे रहस्य काय? विश्वकर्मांची अट आणि अपूर्ण मूर्तींची कथा जाणून घ्या
4

Jagannath Puri: श्रीजगन्नाथांच्या मूर्तींचे रहस्य काय? विश्वकर्मांची अट आणि अपूर्ण मूर्तींची कथा जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.