फोटो सौजन्य- pinterest
प्रदोष व्रत हे त्रयोदशीला तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाच्या पूजेसाठी महत्त्वाचे मानले जाते. जेव्हा चार्तुमासामध्ये हे व्रत येते तेव्हा त्या व्रताला देखील विशेष महत्त्व येते. जाणून घ्या प्रदोष व्रत कधी आहे, शुभ मुहूर्त
जुलै महिन्यातील पहिले प्रदोष योग शुभ योगायोगाने येत आहे. यावेळी चातुर्मासाची देखील सुरुवात होत आहे. मान्यतेनुसार, चातुर्मासामध्ये भगवान शिव कैलास पर्वतावर राहतात असे मानले जाते. यावेळी जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत मंगळवार, 8 जुलै रोजी आहे. मंगळवारी येणाऱ्या या व्रताला भौम प्रदोष व्रत असे म्हटले जाते.
पंचांगानुसार, प्रदोष व्रताच्या दिवशी पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त मंगळवार, 8 जुलै रोजी संध्याकाळी 7.23 वाजता होऊन ही तिथी रात्री 9.24 वाजता संपेल. या शुभ काळात पूजा करणे शुभ मानले जाते.
प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरुन झाल्यावर स्वच्छ कपडे परिधान करावे. भगवान शिवाचे ध्यान करा. त्यानंतर पूजा करण्यासाठी भगवान शिवाची मूर्ती किंवा चित्र यांची स्थापना करुन घ्या. पूजेच्या साहित्यामध्ये बेलपत्र, धतुरा, भांग, शमी पत्र, पांढरे चंदन, अक्षत, धूप, दिवा, गंगाजल, पंचामृत (दूध, दही, तूप, मध, गंगाजल यांचे मिश्रण), फळे, फुले आणि नैवेद्य या गोष्टींचा समावेश करावा. संध्याकाळी पूजा करुन झाल्यावर भगवान शिवावर पंचामृताने अभिषेक करावा.
शंकराला बेसपत्र, धतुरा, भांग, शमी पत्र, चंदन, अक्षत, फुले या गोष्टी अर्पण करा. तसेच ओम नमः शिवाय आणि महामृत्यूंजय मंत्रांचा जप करणे फायदेशीर मानले जाते. पूजा झाल्यानंतर कथा ऐकावी किंवा वाचावी. त्यानंतर भगवान शिव आणि पार्वतीची आरती करावी. त्यानंतर नैवेद्य दाखवून पूजेची सांगता करावी.
आषाढ महिन्यातील चार्तुमासात येणारे प्रदोष व्रत खास मानले जाते. यावेळी भगवान विष्णू योग निद्रेमध्ये जातात आणि शिव विश्वाचे व्यवस्थापन हाती घेतात. अशा वेळी चातुर्मासात येणाऱ्या सर्व व्रतांना विशेष महत्त्व आहे. या व्रताचे महत्त्व शिवपूजेशी संबंधित आहे. प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे. यामुळे सुख, समृद्धी, संपत्ती आणि आरोग्य लाभते, अशी मान्यता आहे. संततीची इच्छा असलेल्या भक्तांनी हे व्रत करणे खूप फायदेशीर ठरते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)