फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस, तिथी याला महत्त्व दिले गेले आहे. त्याचप्रमाणे पौर्णिमा आणि अमावस्या तिथीला देखील महत्त्व आहे. आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे. कारण या आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे देखील म्हटले जाते. गुरुपौर्णिमेला गुरुचे महत्त्व विशेष वर्णन केले जाते. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा देखील म्हटले जाते. कारण असे म्हटले जाते की, या दिवशी वेद व्यासजींचा जन्म झाला होता, ज्यांनी महाभारताची रचना केली होती.
यावेळी आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमा गुरुवार, 10 जुलै रोजी आहे. या दिवशी प्रत्येक जण आपापल्या गुरुला काहींना काही वस्तू भेट म्हणून देतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. पण काहींजणांना प्रश्न असतो की आपण गुरुंना भेट काय द्यावी जेणेकरुन ती वस्तू त्यांच्या उपलब्ध पडू शकते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही गुरुंना राशीनुसार कोणत्या भेटवस्तू देऊ शकता, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांनी आपल्या गुरुंना लाल रंगांचे कपडे, गुलाबाचे फूल, जास्वंदाचे फूल यांसारख्या वस्तू भेट म्हणून द्या्व्यात.
वृषभ राशीच्या लोकांनी गुरुंना पांढऱ्या रंगांचे कपडे, पांढऱ्या रंगांची मिठाई यांसारख्या वस्तू म्हणजे पांढऱ्या रंगांच्या कोणत्याही वस्तू भेट म्हणून द्याव्यात.
मिथुन राशीच्या लोकांनी गुरुंना हिरव्या रंगांची फळे, हिरव्या रंगाचे कपडे म्हणजेच हिरव्या रंगांच्या वस्तू भेट म्हणून द्याव्यात.
कर्क राशीच्या लोकांनी गुरुंना पांढऱ्या रंगांच्या वस्तू भेट म्हणून द्याव्यात.
सिंह राशीच्या लोकांनी गुरुंना लाल रंगांच्या कोणत्याही वस्तू भेट म्हणून देऊ शकता. जसे की, लाल रंगांचे कपडे, मिठाई, फूल इत्यादी
कन्या राशीच्या लोकांनी गुरुंना हिरव्या रंगांच्या वस्तू भेट म्हणून द्याव्यात.
तूळ राशीच्या लोकांनी गुरुंना पांढऱ्या रंगांच्या वस्तू भेट म्हणून द्याव्यात.
वृश्चिक राशीचे लोक गुरुंना गुलाबाचे फूल, हिबिस्कसचे फूल, डाळिंब यांसारख्या वस्तू भेट म्हणून देऊ शकतात.
धनु राशीच्या लोकांनी गुरुंना पिवळ्या रंगांच्या वस्तू भेट म्हणून देऊ शकतात.
मकर राशीच्या लोकांनी गुरुंना निळ्या रंगाच्या कोणत्याही वस्तू भेट म्हणून देऊ शकता.
कुंभ राशीच्या लोकांनी गुरुंना निळ्या रंगाचे कपडे किंवा कोणत्याही गडद रंगाचे कपडे. तसेच दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तू भेट म्हणून देऊ शकता.
मीन राशीच्या लोकांनी गुरुंना पिवळ्या रंगांच्या वस्तू भेट म्हणून देऊ शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)