Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation DUNKI : पंजाबमध्ये भगवंत मान सरकारची मोठी कारवाई; अनेक ट्रॅव्हल एजंट्सचे परवाने तडकाफडकी रद्द

पंजाब सरकारने ४० ट्रॅव्हल एजंट्सचे परवाने रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच परवाना नसलेल्या ट्रॅव्हल एजंट्सवरही पंजाब सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती सांगितली जात आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 24, 2025 | 11:30 PM
पंजाबमध्ये भगवंत मान सरकारची मोठी कारवाई; अनेक ट्रॅव्हल एजंट्सचे परवाने तडकाफडकी रद्द

पंजाबमध्ये भगवंत मान सरकारची मोठी कारवाई; अनेक ट्रॅव्हल एजंट्सचे परवाने तडकाफडकी रद्द

Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकेतील बेकायदा भारतीय स्थलांतरितांना पुन्हा मायदेशात परत पाठवण्याची प्रक्रिया अमेरिका करत आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या लष्करी विमानाने अमेरिकेतील बेकायदा भारतीय स्थलांतरितांना परत पाठवलं. मात्र, पाठवताना स्थलांतरितांच्या हाता-पायात बेड्या घालण्यात आल्या होत्या असे आरोप झाले. यावरून भारतातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं. दरम्यान, भारतातील नागरिकांना बेकायदेशीरपणे अमेरिकेत पाठवण्यात काही ट्रॅव्हल एजंट्स सहभाग असल्याचा आरोप होत आहे. यावरून आता पंजाब सरकारने मोठी कारवाई केली आहे.

पंजाब सरकारने ४० ट्रॅव्हल एजंट्सचे परवाने रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच परवाना नसलेल्या ट्रॅव्हल एजंट्सवरही पंजाब सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती सांगितली जात आहे. आज ४० ट्रॅव्हल एजंट्सवर कारवाई करण्यात आली आहे. हे ट्रॅव्हल एजंट्स लोकांना आमिष दाखवून ‘डंकी रूट’ने अमेरिकेत पाठवत असल्याचा आरोप आहे. ही कारवाई करण्यात आलेल्या ट्रॅव्हल एजंट्समध्ये नुकतेच अमेरिकेतून हद्दपार करण्यात आलेल्या स्थलांतरितांशी संबंध असल्याचा आरोप आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, अमृतसरच्या उपायुक्त साक्षी साहनी यांच्या आदेशानुसार बनावट ट्रॅव्हल एजंट्सवर ही कारवाई करण्यात आली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिका आणि पनामा येथून हद्दपार केलेले ३०० हून अधिक भारतीय हद्दपारीच्या फ्लाइटने देशात परतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच अमृतसर पोलिसांनी शहरातील २७१ ट्रॅव्हल एजंट्सना नोटीस बजावली असून परवान्याचे नूतनीकरण करण्यास सांगितलं आहे. याबरोबरच उपविभागीय दंडाधिकारी यांना ट्रॅव्हल एजंट आणि इमिग्रेशन सल्लागारांच्या कार्यालयात कागदपत्रांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ट्रॅव्हल एजंट्सच्या विरुद्ध कोणतीही तक्रार आल्यास तत्काळ कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या बरोबरोच ट्रॅव्हल एजंट्सना त्यांच्या कार्यालयात योग्य रेकॉर्ड ठेवण्याची आणि ते अपूर्ण कागदपत्रांसह काम करत नाहीत याची खात्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच गेल्या ४८ तासांत पोलिसांमध्येही मोठे फेरबदल करण्यात आले असून नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बरोबरच पंजाबमध्ये ट्रॅव्हल एजंट्सची कागदपत्रे कसून तपासली जात असून लोक बेकायदेशीरपणे स्थलांतर करण्याचा प्रयत्न करू नये, यासाठी जनजागृती देखील करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे.

Web Title: Punjab govt big action on 40 travel licenses agents after us deported indian operation dunki

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 11:30 PM

Topics:  

  • Bhagwant Mann
  • Punjab government
  • US government

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.