फोटो सौजन्य- istock
राधा अष्टमीचा सण भाद्रपद शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला साजरा केला जातो. यावेळी अष्टमी तिथी रविवार, 31 ऑगस्ट रोजी आहे. धार्मिक मान्यतेनुसार, जन्माष्टमीच्या 15 दिवसांनी राधाचा जन्म झाला होता. तसेच राधा राणीला ब्रज, भक्ती आणि प्रेमाची प्रमुख देवता मानले जाते. मथुरा, वृंदावनसह संपूर्ण ब्रजमध्ये राधा राणीचा उत्सव साजरा केला जातो. यावेळी राधा अष्टमीला शुभ योग तयार होत आहे त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे यावेळी काही नियमांचे पालन देखील केले जाते.
राधाजी ही भगवान कृष्णाच्या शक्तीचे आणि प्रेमाचे सर्वोच्च प्रतीक आहे. श्रीमद् भागवत आणि पुराणांमध्ये उल्लेख केल्यानुसार, राधा-रामन कृष्णाच्या नावाशिवाय कृष्णाचे स्मरण अपूर्ण आहे. या दिवशी उपवास केल्याने भक्ती, वैवाहिक सुख, प्रेम आणि समृद्धी मिळते. राधाष्टमीचे व्रत केल्याने अविवाहित मुलींना योग्य वर मिळतो असे मानले जाते. विवाहित महिलांसाठी हे व्रत वैवाहिक जीवनामध्ये आनंद आणि सौभाग्य राहते. जे भक्त राधा कृष्णाचे स्मरण करुन कीर्तन करतात त्यांना मोक्ष आणि दिव्य प्रेम प्राप्त होते.
राधा अष्टमी तिथीची सुरुवात शनिवार, 30 ऑगस्ट रोजी रात्री 10.46 मिनटांनी होणार आहे आणि या तिथीची समाप्ती 31 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा म्हणजे 12.57 वाजता होईल. उद्यतिथीनुसार राधा अष्टमीचा उत्सव रविवार, 31 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे.
भाद्रपद शुक्ल अष्टमीला रात्री 12 वाजता पूजा करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो. कारण यावेळी राधाराणी प्रकट झाली होती असे म्हटले जाते. राधा अष्टमीला बुध आणि सूर्य सिंह राशीत असल्याने बुधादित्य योग तयार होणार आहे. त्यासोबतच सिंह राशीत केतू, सूर्य आणि बुध यांच्या उपस्थितीमुळे त्रिग्रही योग तयार होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, शुभ मुहूर्तावर राधा अष्टमीची पूजा केल्याने व्यक्तीला सर्व सुख मिळतात अशी मान्यता आहे. तसेच जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटका होते, असे म्हटले जाते.
या दिवशी उपवास करावा. या उपवासादरम्यान तुम्ही फळे खावू शकता.
दुपारी श्री राधाजींची पूजा करा आणि राधा मंत्रांचा जप करा.
राधा-कृष्णाच्या मूर्तीला किंवा चित्राला गंगाजलाने स्नान घाला. त्यानंतर फुले, कपडे, धूप, दिवे आणि नैवेद्य अर्पण करा.
राधा स्तुती, राधा सहस्रनाम किंवा राधे राधे जप करणे विशेषतः फायदेशीर आहे. संध्याकाळी किंवा पारायण काळात फळे खाऊन उपवास सोडा.
राधा अष्टमीचा उपवास करतेवेळी धान्य किंवा मिठाचे सेवन करु नये. त्याचप्रमाणे मांसाहाराचे सेवन करु नये.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)