फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये प्रत्येक व्रत आणि सणाला विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला रवी प्रदोष व्रत पाळले जाते. देवांचे देव महादेव यांच्यासाठी प्रदोष व्रत पाळले जाते. तसेच, प्रदोष व्रत पाळल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते. मानसिक ताण आणि तणाव यासारख्या समस्या असलेल्या लोकांनी प्रदोष व्रत करणे फायदेशीर ठरते. जून महिन्यातील रवी प्रदोष व्रताच्या दिवशी कोणते उपाय करायचे, जाणून घेऊया.
त्रयोदशी तिथीची सुरुवात रविवार, 8 जून रोजी सकाळी 7.17 वाजता होईल आणि त्याची समाप्ती सोमवार, 9 जून रोजी सकाळी 9.35 वाजता होईल. यादरम्यान प्रदोष काळात पूजा करण्याची वेळ संध्याकाळी 6.34 ते 8.48 पर्यंत असेल. प्रदोष व्रताचे काम सूर्यास्तापासून सुरू होते, भोलेनाथाच्या पूजेसाठी प्रदोष काळ हा सर्वोत्तम मानला जातो. रविवारी प्रदोष व्रत येत असल्याने त्यास रवी प्रदोष व्रत असे म्हटले जाते.
असे म्हटले जाते की, प्रदोष व्रत केल्याने लोकांच्या घरातील सर्व समस्या दूर होतात. तसेच ज्या लोकांच्या आयुष्यात पैशाची कमतरता आहे, घरात भांडणे होतात. जे लोक नेहमीच अशांत असतात किंवा नोकरी मिळवण्यात अडचणी येत असतात किंवा लग्नात काही अडचणी येत असतात, त्यांनी रवि प्रदोषाचे व्रत नक्कीच करावे.
रवि प्रदोष व्रत पाळल्याने आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात आणि धनप्राप्ती देखील होते. हे व्रत केल्याने भगवान शिव तसेच सूर्यदेवाचे आशीर्वाद मिळतात आणि भगवान शिव अनेक भक्तांवर आपल्या आशीर्वादांचा वर्षाव करतात, अशी मान्यता आहे.
रविवार, 8 जून रोजी प्रदोष व्रत पाळले जाणार आहे. या दिवशी पूजेच्या वेळी घरातून पाण्याने भरलेला लोटा आणि तुपाचा दिवा घेऊन संध्याकाळी एखाद्या शिव मंदिरात जाऊन पाणी अर्पण करुन झाल्यानंतर दिवा लावल्याने तुम्हाला 26 प्रदोष उपवासांइतकेच पुण्य मिळते.
रवी प्रदोष व्रताच्या दिवशी सूर्याला जल अर्पण करताना या मंत्राचा जप करा. ओम घृणः सूर्याय नमः
आर्थिक संकट असल्यास या दिवशी पूजा करतेवेळी शिवलिंगावर काळे तीळ, तांदूळ आणि पाणी अर्पण करावे.
शिवपुराण आणि स्कंद पुराणात प्रदोष व्रताचे महत्त्व सविस्तरपणे सांगण्यात आले आहे. असे म्हटले जाते की, या दिवशी भोलेनाथाची पूजा, प्रार्थना आणि उपवास केल्याने व्यक्तीचे आजार आणि दोष दूर होतात आणि त्याला धन प्राप्त होते.
रवि प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी स्नान इत्यादी विधी केल्यानंतर, स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर, शिवलिंगावर दूध आणि नंतर पाण्याने अभिषेक करा. या दरम्यान, ‘ॐ नमः शिवाय’ या पंचक्षरी मंत्राचा जप करा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)