फोटो सौजन्य- pinterest
आज बुधवार, 15 ऑक्टोबर रोजी चंद्र स्वतःच्या कर्क राशीमध्ये प्रवेश करत आहे. चंद्र स्वतःच्या कर्क राशीमध्ये संक्रमण करत असल्याने गौरी योग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र आणि सूर्य शुक्रादित्य योग तयार करतील, तर स्वामी बुध मंगळासोबत युती करून लाभ योग तयार करतील. त्याबरोबरच पुष्प नक्षत्राच्या युतीमुळे सधी योग तयार होईल. अशा वेळी मेष, मिथुन, तूळ, धनु आणि कुंभ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. या शुभ योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला सरकारी योजनांचा फायदा होईल. तुम्ही व्यवसायामध्ये केलेल्या योजनामुळे तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. तुम्हाला अनुभवी आणि वरिष्ठ व्यक्तीकडून सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत तुमचा आजचा दिवस खूप चांगला राहील. तुमचे कौटुंबिक जीवन चांगले राहील. तुमच्या भावंडांचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या कोणत्याही चिंता दूर होतील. ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. आईच्या तब्येतीमध्ये सुधारणा होईल. तुमचे कौटुंबिक जीवन चांगले राहील. नोकरी करणाऱ्या लोकांचे वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकते. दूरचा मित्र किंवा नातेवाईक भेटू शकतात. आर्थिक बाबतीत तुम्हाला नशिबीची साथ मिळेल.
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा तुम्हाला फायदा होईल. तुमच्या चिंता दूर होऊ शकतात. प्रवासाचे नियोजन देखील करता येईल. एखाद्याला पैसे उधार दिले असल्यास ते परत मिळू शकतात. व्यवसाय तेजीत असल्यास तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. बऱ्याच काळापासून अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्हाला काही चांगली बातमी देखील मिळू शकते.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. पैसे कमविण्याच्या संधी मिळतील. तुम्हाला काही नवीन लोक भेटतील जे भविष्यात तुम्हाला लाभ देतील. तुम्ही एखादा मोठा व्यवसाय करार करू शकता. जे लोक विमा आणि बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. किराणा व्यवसायात गुंतलेल्यांना त्यांच्या उत्पन्नात वाढ होताना दिसून येईल.
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्हाला अनपेक्षित स्रोताकडून नशीब आणि आर्थिक लाभ मिळेल. तुम्हाला प्रत्येक कामात वडिलांचा पाठिंबा मिळेल. बऱ्याच काळापासून अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण होऊ शकते. करिअरसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. तुमचे राजकीय संबंध तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या सहकार्याचाही फायदा होईल. मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)