फोटो सौजन्य- pinterest
आजचा 15 ऑक्टोबरचा दिवस सामान्य राहील. आज अंक 6 असणाऱ्या लोकांचा स्वामी ग्रह शुक्र आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर शुक्र ग्रहाचा प्रभाव असलेला दिसून येईल. आजच्या बुधवारच्या दिवसाचा स्वामी ग्रह बुध आहे आणि बुधाचा अंक 5 आहे. आज मूलांक 5 असणाऱ्या लोकांची कामाच्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल आणि गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. शहाणपण आणि बुद्धिमत्तेच्या बळावर तुम्ही सर्वात कठीण परिस्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमचा जोडीदाराशी वाद होऊ शकतो त्यामुळे सावधगिरी बाळगावी.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला आज आर्थिक लाभ होऊ शकतो. भावनिकदृष्ट्या कोणताही निर्णय घेणे टाळावे कारण यामुळे नुकसान होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांमध्ये अस्वस्थचा जाणवू शकते. व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी कोणतेही काम विचारपूर्वक आणि हुशारीने करावे लागेल. आर्थिक बाबतत सावधगिरी बाळगा अन्यथा नुकसान होऊ शकते. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नामध्ये अपेक्षित वाढ होईल. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. तुमचे पैसे हुशारीने गुंतवा. घाईघाईने निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांशी तुमचा वाद होऊ शकतो. तुम्हाला बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. जोडीदारासोबत तुमचे असलेले मतभेद दूर होतील.
मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या बुद्धिमत्तेची सर्वांकडून प्रशंसा होईल. कौटुंबिक जीवनात तुमचा तणाव वाढू शकतो. संयम राखणे महत्त्वाचे राहील. जोडीदारासोबतचा वेळ घालवणे सामान्य राहील. शहाणपणाने गुंतवणूक केल्यास अपेक्षित फायदे होऊ शकतात.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमचा आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरी करणाऱ्यांना नोकरीमध्ये अपेक्षित बदल करु शकतात. कौटुंबिक बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही जोडीदारासोबत वेळ घालवू शकतात. वैवाहिक जीवन चांगले राहील. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अपेक्षित यश मिळू शकते.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही एखाद्या गोष्टीमुळे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहू शकता. पैशाच्या बाबतीत तुम्हाला काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतील, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. दरम्यान, वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, नाहीतर तुमच्यावरील मानसिक ताण वाढू शकतो.
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत तुमचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्ही कोणतेही निर्णय काळजीपूर्वक घेतले पाहिजेत, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी वाद होऊ शकतो. संयम राखणे आणि कोणतेही निर्णय काळजीपूर्वक घेणे महत्त्वाचे आहे.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात यश मिळविण्यासाठी तुम्हाला नवीन मार्ग सापडतील. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्ही कामामध्ये व्यस्त राहू शकता. तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)