Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sai Baba: साईंनी 3 दिवस त्यागले होते शरीर, काय आहे यामागील कथा जाणून घ्या

शिर्डीच्या साईबाबांच्या अनेक चमत्कारीत कथा प्रसिद्ध आहे. त्यातीलच एक कथा म्हणजे तीन दिवसांसाठी देहत्याग केल्याची कथा. भक्तांच्या मते, साईबाबांनी पूर्वसूचना देऊन तीन दिवस शरीर निश्चल ठेवले आणि त्यानंतर पुन्हा पूर्ववत झाले. ही घटना त्यांच्या अद्भुत योगसामर्थ्याची आणि आध्यात्मिक शक्तीची साक्ष मानली जाते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 04, 2026 | 09:40 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • साईंनी 3 दिवस त्यागले होते शरीर
  • साईंबाबांनी देहत्याग केल्याची कथा
  • या कथेमागील आध्यात्मिक महत्त्व
 

शिर्डीचे साईबाबा यांचे जीवन अनेक अद्भुत घटनांनी भरलेले आहे. त्यांच्या भक्तांमध्ये आजही श्रद्धेने सांगितली जाणारी एक घटना म्हणजे साईबाबांनी तीन दिवसांसाठी देहत्याग केल्याची. ही घटना केवळ चमत्कार म्हणून नव्हे, तर त्यांच्या उच्च आध्यात्मिक सामर्थ्याचे प्रतीक मानली जाते.

शिर्डीच्या साईंबाबाचे महाराष्ट्रातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात भक्त आहेत. सबका मालिक एक ही साईंची शिकवण ही सर्वांना माहिती आहे. साईंनी जात, धर्म, पंत आणि गरिबी असा कोणताही भेदभाव न करता गरजूंना नेहमीच मदत केली. अनेकांना संकटांतून आणि अंधकारातून प्रकाशाची वाट दाखवली. अनेकांना आपल्या शिकवणीनेे आणि ज्ञानप्रबोधनाने मार्ग दाखवणाऱ्या साईंबाबाचे अनेक चमत्काराच्या कथा प्रचलित आहे. यातीलच साईंबाबाच्या काही कथा ऐकून तुम्ही हैराण व्हाल. यापैकी सलग तीन दिवस साईंनी आपल्या शरीराचाही त्याग केला याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? साईंनी 3 दिवस त्यागले होते शरीर काय आहे कथा जाणून घेऊया

शरीर त्यागल्याची कथा

साईबाबांनी तीन दिवसांसाठी शरीर सोडलं होतं. साईबाबांनी त्यांचे भक्त असलेल्या महाळसापती बोलवून घेतलं, जर मी तीन दिवसांत परत आलो नाही तर माझं शरीर अमुक ठिकाणी दफण कर असं त्यांनी महाळसापतींना सांगून ठेवलं. तीन दिवस तुला माझ्या शरीराचं रक्षण करायचं आहे, असं त्यांनी महाळसापतींना सांगितलं आणि त्यांनी डोळे मिटले. हळूहळू त्यांची श्वसनक्रिया बंद झाली, शरीराची हालचाल ही थांबली. साईंच निधन झालं असं अनेकांना वाटलं. वैद्य आणि डॉक्टरांनी देखील त्यांना तपासलं. मात्र साईंनी दिलेल्या आदेशानुसार महाळसापतीनी सर्वांना साईंबाबापासून दूर राहण्यास सांगितलं.

Sai Baba: साईबाबांनी पाण्याने दिवे कसे पेटवले? जाणून घेऊया त्यांनी दिलेली मोलाची शिकवण

तीन दिवसानंतर काय घडलं

साईंच्या शरीराचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर गावकरी महाळसापतींवर नाराजही झाले. तीन दिवस महाळसापतींनी साईबाबाचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन जागरण केलं. तीन दिवस शरीराचा त्याग करून झाल्यावर साईंबाबांनी पुन्हा शरीर धारण केलं आणि सगळे गावकरी थक्क झाले आणि भक्तांमध्ये पुन्हा एकदा आनंद संचारला.

Chandra Gochar: चंद्र करणार मकर राशीमध्ये प्रवेश, या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

आध्यात्मिक महत्त्व

या घटनेकडे केवळ चमत्कार म्हणून पाहिले जात नाही. योगशास्त्रानुसार उच्च कोटीचे योगी आपल्या प्राणशक्तीवर नियंत्रण ठेवू शकतात, असे मानले जाते. साईबाबांच्या या कृतीतून शरीर आणि आत्मा वेगळे असल्याचा आध्यात्मिक संदेश दिला जातो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: साईबाबांनी तीन दिवस शरीर का त्यागले होते?

    Ans: भक्तांच्या श्रद्धेनुसार साईबाबांनी आपल्या योगसामर्थ्याची प्रचीती देण्यासाठी आणि आत्म्याचे स्वरूप समजावून सांगण्यासाठी तीन दिवस देहत्याग केला होता.

  • Que: साईबाबांनी ही माहिती आधी कोणाला दिली होती?

    Ans: साईबाबांनी आपल्या निकटवर्तीय भक्त महालसापती यांना तीन दिवस शरीराची काळजी घेण्यास सांगितले होते.

  • Que: या कथेतून कोणता संदेश मिळतो?

    Ans: गुरूवरील श्रद्धा, संयम आणि विश्वास यांचे महत्त्व या कथेतून अधोरेखित होते.

Web Title: Sai baba why sai baba left his body for three days what is the story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 09:40 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.