Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संकष्टी चतुर्थीला करा या गोष्टींचे दान, तुमची होईल प्रगती

माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी व्रताला संकष्टी चतुर्थी म्हणतात. सकट चौथला दानाचे खूप महत्त्व आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही वस्तूंचे दान करणे खूप शुभ मानले जाते. जाणून घेऊया या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करा

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 16, 2025 | 11:28 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो. यंदा हे व्रत शुक्रवार, 17 जानेवारीला पाळण्यात येणार आहे. हे व्रत भगवान श्री गणेश आणि माता सकट यांना समर्पित आहे. या दिवशी गणेशाची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते, असे मानले जाते. शास्त्रानुसार सकट चौथचे व्रत पाळल्याने मुलांना दीर्घायुष्य, सुख-समृद्धी प्राप्त होते. श्री गणेश आणि माता सकट यांची विधिवत पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि धन-समृद्धी येते, अशी पौराणिक मान्यता आहे. मान्यतेनुसार या दिवशी काही वस्तूंचे दान करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीला कोणत्या गोष्टींचे दान करणे फायदेशीर ठरेल.

संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त

माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी शुक्रवार, 17 जानेवारीला पहाटे 4.6 पासून सुरू होईल आणि शनिवार 18 जानेवारीला पहाटे 5.30 वाजेपर्यंत राहील. शुक्रवारी 17 जानेवारी रोजी संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळण्यात येणार आहे. यावेळी चंद्रोद्य रात्री 9.9 वाजता असेल. 

नवीन घराचे बांधकाम करताना या गोष्टी ठेवा, कोणताही राहणार नाही दोष

या वस्तूंचे करा दान

काळ्या तिळाचे दान

संकष्टी चतुर्थीला काळे तीळ दान करणे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार काळ्या तिळात अनेक देवता वास करतात. त्याचे दान केल्याने पुण्य तर मिळतेच, शिवाय शरीर निरोगी राहून बालकाला दीर्घायुष्य लाभते.

गुळाचे दान

या दिवशी गुळाचे दान केल्यास श्रीगणेश प्रसन्न होतात, असे मानले जाते. हे दान जीवनातील संकटे दूर करते आणि नशीब मजबूत करते. त्यामुळे सकट चौथच्या दिवशी गुळाचे दान केले जाते.

तुपाचे दान

संकष्टी चतुर्थीला तूप दान करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी तूप दान केल्याने आरोग्य आणि धनाशी संबंधित समस्या दूर होतात. तूप दान केल्याने शुभ फल प्राप्त होते असे मानले जाते.

30 वर्षांनंतर मीन राशीमध्ये शनिचे संक्रमण, या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

मिठाचे दान

या दिवशी मीठ दान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. मिठाचे दान केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते आणि वाईट नजरेपासून मुक्ती मिळते, असा पारंपरिक समज आहे.

कपड्यांचे दान

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उबदार कपडे दान करणे खूप शुभ मानले जाते. हा उपवास साधारणपणे जानेवारी महिन्यात होतो, जेव्हा हिवाळा असतो. या दिवशी गरजूंना उबदार कपडे किंवा ब्लँकेट दान केल्याने पुण्य प्राप्त होते. हे दान जीवनात आर्थिक प्रगती आणि आशीर्वाद देणारे मानले जाते.

( टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Sankashti chaturthi 2025 donation of these things will be your progress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2025 | 11:28 AM

Topics:  

  • Sankashti Chaturthi

संबंधित बातम्या

Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीच्या रात्री करा खास उपाय, आर्थिक अडचणी होतील दूर
1

Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीच्या रात्री करा खास उपाय, आर्थिक अडचणी होतील दूर

उपसावाच्या दिवशी शरीरात टिकून राहील ऊर्जा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा Fasting Energy Smoothie, नोट करून घ्या रेसिपी
2

उपसावाच्या दिवशी शरीरात टिकून राहील ऊर्जा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा Fasting Energy Smoothie, नोट करून घ्या रेसिपी

पाहूनी ते गोजिरवाणं रूप मोह होई मनास खूप…! संकष्टी चतुर्थीनिमित्त नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना पाठवा भक्तिमय शुभेच्छा
3

पाहूनी ते गोजिरवाणं रूप मोह होई मनास खूप…! संकष्टी चतुर्थीनिमित्त नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना पाठवा भक्तिमय शुभेच्छा

Sankashti Chaturthi 2026: अधिक महिन्यात संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ
4

Sankashti Chaturthi 2026: अधिक महिन्यात संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.