Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sarvapitri Amavasya: सर्वपित्री अमावस्येला या गोष्टीचे दान केल्याने जीवनात येऊ शकते सुख समृद्धी

Sarvapitri Amavasya: सर्वपित्री अमावस्या सर्वत्र शनिवार, १० ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे. पितृपक्षातील शेवटचा दिवस आहे. या दिवशी काही गोष्टींचे दान करणे शुभ मानले जाते. कोणत्या गोष्टी दान कराव्यात जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 10, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:
  • सर्वपित्री अमावस्येला या गोष्टींचे दान करणे असते शुभ
  • सर्वपित्री अमावस्या कधी आहे
  • दान करण्याचे काय आहे महत्त्व
सर्वपित्री अमावस्या शनिवार, १० ऑक्टोबर रोजी आहे. ही तिथी पितृपक्षातील शेवटची आणि खूप महत्त्वपूर्ण मानली जाते. या दिवशी ज्या लोकांची तिथी माहीत नाही किंवा श्राद्ध करण्याचे विसरला असाल तर त्याचे श्राद्ध केले जाते. श्राद्धा सोबतच या दिवशी दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी केलेल्या दानामुळे सर्व पितरांचे आशीर्वाद मिळतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. सर्वपित्री अमावस्येला कोणत्या गोष्टीचे दान करावे जाणून घ्या

काळया तिळाचे दान

सर्वपित्री अमावस्येला काळया तिळाचे दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी काळे तीळ दान केल्याने पितृदोष दूर होतात आणि जीवनात येणाऱ्या समस्या दूर होऊ शकतात. यासोबतच पितरांच्या आशीर्वादासोबत तुमचे आरोग्य देखील चांगले राहील.

अन्नाचे दान

हिंदू धर्मामध्ये अन्न दानाला महादान मानले जाते. त्यामुळे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी अन्नाचे दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी गहू, तांदूळ, डाळ, फळ इत्यादी गोष्टी तुम्ही दान करू शकता. या गोष्टी दान केल्याने पितरांसोबत देवी अन्नपूर्णाचा आशीर्वाद मिळतो.

Sarva Pitru Amavasya: देशभरात अशी साजरी होते सर्वपित्री अमावस्या; जाणून घेऊया पितृस्मरणाच्या वेगवेगळ्या परंपरा

वस्त्रांचे दान

सर्वपित्री अमावस्येला वस्त्रांचे दान केल्याने पितरांना मुक्ती मिळते. या दिवशी तुम्ही धोती, कुर्ता, पांघरूण इत्यादीचे दान करू शकता. धार्मिक श्रद्धेनुसार वस्त्रांचे दान केल्याने मान सन्मानाची प्राप्ती होते.

गुळाचे दान

सर्वपित्री अमावस्येला गुळाचे दान केल्याने अपत्यप्राप्ती होते आणि जीवनात येणारे अडथळे देखील दूर होतात. गुळाचे दान केल्याने पितरांचे आशीर्वाद तुमच्यावर राहतात आणि कुटुंबामध्ये सुख शांती राहते.

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला जुळून येणार शुभ योग; मोठे यश मिळण्याची शक्यता

चांदीचे दान

चांदीला शुद्धता आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार चांदीचे दान केल्याने पितृदोषपासून मुक्ती मिळते. या दिवशी तुम्ही चांदीच्या भांड्याचे देखील दान करू शकता. चांदीचे दान केल्याने तुमच्या जीवनात सकारात्मकता येऊ शकते आणि मानसिक शांती मिळू शकते.

सर्वपित्री अमावस्याचे महत्त्व

सर्व पितृ अमावस्या हा पितृ पक्षाचा शेवटचा दिवस असून, तो सर्व ज्ञात आणि अज्ञात पूर्वजांसाठी श्राद्ध करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मानला जातो. गरुड पुराणानुसार, जर एखाद्या व्यक्तीला आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख माहित नसेल किंवा ती व्यक्ती विशिष्ट तारखेला आपल्या पूर्वजांसाठी श्राद्ध करू शकत नसेल, तर ती व्यक्ती सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध करून पुण्य मिळवू शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Sarvapitri amavasya it is auspicious to donate this thing pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • amavasya
  • dharm
  • Pitru Paksha

संबंधित बातम्या

Sarvapitri Amavasya: सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पिंपळाशी संबंधित करा हे विशेष उपाय, पूर्वज आणि शनिदेव होतील प्रसन्न
1

Sarvapitri Amavasya: सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पिंपळाशी संबंधित करा हे विशेष उपाय, पूर्वज आणि शनिदेव होतील प्रसन्न

Sahasra Chandra Darshan: हजार पौर्णिमा झाल्यावरच सहस्रचंद्रदर्शन सोहळा करावा की आगोदर? काय सांगते धर्मशास्त्र
2

Sahasra Chandra Darshan: हजार पौर्णिमा झाल्यावरच सहस्रचंद्रदर्शन सोहळा करावा की आगोदर? काय सांगते धर्मशास्त्र

Navratri 2026: पितृपक्ष संपताच नवरात्रीची सुरुवात का होते? जाणून घ्या धार्मिक कारणे
3

Navratri 2026: पितृपक्ष संपताच नवरात्रीची सुरुवात का होते? जाणून घ्या धार्मिक कारणे

Lairai Devi Temple: गोव्यातील लइराई देवी कोण आहे? शिरगाव जत्रेचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या
4

Lairai Devi Temple: गोव्यातील लइराई देवी कोण आहे? शिरगाव जत्रेचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.