फोटो सौजन्य- pinterest
आज शनिवार, 9 ऑगस्टचा दिवस. आजचा दिवस शनिदेवाला समर्पित आहे. आज चंद्र शनिच्या मकर राशीत दिवसरात्र संक्रमण करणार आहे. तसेच शनि स्वतः गुरूच्या मीन राशीत असून गुरूसोबत केंद्र योग तयार करेल. चंद्र मंगळासोबत नववा पंचम योग तयार करेल. त्यासोबतच सूर्य बुधासोबत संसप्तक योग करेल. श्रावण नक्षत्राच्या संयोगाने, एक सौभाग्य योग देखील तयार होत आहे. यामुळे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे शोभाग्य योगाच्या प्रभावामुळे मेष, मिथुन यासह काही राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. सौभाग्य योगामुळे मिथुन राशीसह या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांची स्थिती सुधारेल. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून लाभ होऊ शकतो. जे लोक कौटुंबिक व्यवसायाशी संबंधित आहेत त्यांना कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्हाला अनपेक्षित लाभ होऊ शकतो. मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. राजकीय आणि सामाजिक संपर्कांचाही तुम्हाला फायदा होऊ शकतो.
मिथुन राशीच्या लोकांवर आज कामाचा ताण राहू शकतो. बुद्धिमत्ता आणि हुशारीने सर्व गुंतागुंत आणि समस्या सोडवू शकता. कोणतीही गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर राहील. तुम्ही नवीन कामाची सुरुवात करण्याच्या विचार करत असाल तर तुम्हाला अपेक्षित फायदा होईल. सामाजिक क्षेत्रात तुमचा आदर वाढेल.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला राहील. तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकतात. व्यवसायात तुमचे उत्पन्न वाढू शकते. तुम्हाला भागीदारीतील कामात तुमच्या भागीदारांकडून पाठिंबा आणि फायदे मिळू शकतात. तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तुमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद असल्यास ते दूर होऊ शकतात. तसेच तुम्ही धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता.
तूळ राशीचे लोक आज कामामध्ये व्यस्त राहतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. वाहन, घर किंवा जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. व्यवसायात तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. हॉटेल आणि गिफ्ट व्यवसायात काम करणाऱ्या लोकांना आज नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहील.
मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस खूप फायदेशीर राहणार आहे. तसेच आज तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतात. दीर्घकालीन योजनेत केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला फायदा होईल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. मालमत्तेमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्ही कामानिमित्त प्रवास करु शकता. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित लाभ होऊ शकतो. तुमची नियोजित सर्व कामे आज पूर्ण होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)