फोटो सौजन्य- pinterest
रक्षाबंधनाच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग तयार होत आहे. यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी 24 वर्षांनंतर 4 शुभ योग तयार होत आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी, बुधादित्य राजयोग, सौभाग्य योग, गजलक्ष्मी राजयोग आणि सर्वार्थ सिद्धी योग हे शुभ योग तयार होत आहे. यावेळी कर्क राशीमध्ये सूर्य असेल आणि बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग राजयोग तयार होईल. तर मिथुन राशीत शुक्र आणि गुरु यांच्या युतीमुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होईल. यासोबतच चंद्र मकर राशीत असल्याने सर्वार्थ सिद्धी आणि सौभाग्य योग तयार होईल. रक्षाबंधनाच्या दिवशी या शुभ ग्रहांचा फायदा कर्क राशीच्या लोकांसह या राशीच्या लोकांना होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये दुसऱ्या घरात गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे. राशीचा स्वामी शुक्र असल्याने तो गुरु ग्रहाशी युती करेल. यामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल. त्याचसोबत वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद असल्यास तो दूर होऊ शकतो. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला राहील.
मिथुन राशीत गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे. यावेळी गुरु आणि शुक्र यांचा तुमच्यावर विशेष प्रभाव राहील. त्यामुळे या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्यामध्ये वेगळा आत्मविश्वास दिसून येईल. तुमची सर्व कामे वेळेत पूर्ण होतील. तुमच्या बुद्धिमत्तेच्या बळावर तुम्ही कामाच्या ठिकाणी सर्वांना सहजपणे प्रभावित कराल.
कर्क राशीमध्ये बुधादित्य राजयोग तयार होत आहे. यावेळी बुध आणि सूर्य कर्क राशीत एकत्र संक्रमण करत असल्याने बुधादित्य बुधादित्य राजयोग तयार होईल. या काळात तुम्हाला जुन्या कामांमध्ये अपेक्षित यश मिळेल. जे लोक उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करत आहे त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.
मकर राशीच्या लोकांचा रक्षाबंधनाचा दिवस खूप शुभ राहणार आहे. या काळात चंद्र मकर राशीमध्ये असेल तर सूर्य तुमच्या राशीवर सप्तम दृष्टिकोनात राहील. यामुळे बुधादित्या राजयोगाचा फायदा होणार आहे. तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. राजकीय क्षेत्राशी संबंधित लोकांना जनतेचा पाठिंबा मिळू शकतो. या काळात तुम्हाला संपत्ती, समृद्धी आणि आदर मिळेल. त्यासोबत तुमच्या जीवनात या काळाचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
धनु राशीच्या लोकांना गजलक्ष्मी राजयोगाचा फायदा होणार आहे. या काळात तुमच्या प्रेम जीवनात चांगले परिणाम होतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. त्यासोबतच संपत्ती आणि मालमत्तेचा पूर्ण आनंद मिळेल. आज तुमच्या खर्च वाढू शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)