फोटो सौजन्य- pinterest
सप्टेंबर महिना ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. या काळात ग्रहांचा राजा सूर्यासोबतच बुध, शुक्र आणि मंगळ यांसारखे प्रभावशाली ग्रह देखील त्यांची राशी बदलणार आहेत. ग्रहांच्या या हालचालीमुळे व्यक्तींवर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. करिअर, आरोग्य, प्रेमसंबंध आणि आर्थिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो. जेव्हा सर्व ग्रह एकत्र येतात त्यावेळी त्यांची गती बदलतात आणि त्याचा परिणाम विविध राशीच्या लोकांवर होताना दिसून येतो.
तसेच या महिन्यामध्ये 1 सप्टेंबर रोजी गौरी पूजन, 2 सप्टेंबर रोजी गौरी गणपती विसर्जन तर 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. त्यानंतर पितृपक्षाची सुरुवात होईल. तर 22 सप्टेंबरपासून नवरात्राची सुरुवात होईल. मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना कसा असेल, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी हा महिना मिश्रित राहील. या महिन्यात तुम्ही कामाच्या ठिकाणी व्यस्त राहू शकता. तुमचे काम पूर्ण प्रामाणिकपणे कराल आणि तुमची प्रतिमा चांगली ठेवण्याचा प्रयत्न कराल. ऑफिस किंवा व्यवसायात तुमच्या कष्टाचे फळ मिळेल. आरोग्य आणि वैयक्तिक संबंधांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असेल.
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा महिना चांगला राहील. तुम्ही कामाच्या ठिकाणी सक्रिय आणि प्रभावशाली राहाल. खूप मेहनत घेतल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कार्यालयात तुमची प्रतिष्ठा वाढेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. गुंतवणुकीसाठी हा महिना चांगला राहील. या महिन्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा महिना मिश्रित राहील. या महिन्याची सुरुवात तुम्हाला आव्हानात्मक ठरु शकते. ज्यामुळे मानसिक दबाव येऊ शकतो. घर, वैद्यकीय किंवा वाहनाशी संबंधित खर्चात अनपेक्षित वाढ होऊ शकते. आरोग्याची समस्या उद्भवू शकते. कौटुंबिक वातावरण थोड्या काळासाठी तणावपूर्ण बनू शकते.
कर्क राशीच्या लोकांसाठी हा महिना अनुकूल राहील. तुम्हाला तुमचा वेळ आणि ऊर्जा व्यवस्थापित करण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, ज्यामुळे मानसिक दबाव येऊ शकतो. तुमच्या योजना शेअर करणे टाळा. तुम्हाला तुमच्या ध्येयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे लागेल.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना चढ-उतारांचा असू शकतो. घरातील जबाबदाऱ्या आणि कामाचा दबाव जाणवू शकतो. कौटुंबिक वातावरणात थोडासा तणाव जाणवू शकतो. मानसिक थकवा जाणवू शकतो. कामाच्या ठिकाणी अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने, तुम्हाला एकट्याने कामाचा भार उचलावा लागू शकतो.
कन्या राशीच्या लोकांसाठी हा महिना चांगला राहील. तुमच्यासाठी या महिन्यामध्ये अनेक संधी उपलब्ध होतील. कामाच्या ठिकाणी तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला मोठी जबाबदारी किंवा उच्च पद देखील मिळू शकते. जे लोक बऱ्याच काळापासून बेरोजगार आहेत त्यांना अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील.
तूळ राशीच्या लोकांचा हा महिना सामान्य राहील. या महिन्यात तुमच्या दीर्घकालीन योजना पूर्ण होतील तसेच प्रलंबित कामे देखील पूर्ण होतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. सजावट किंवा चैनीच्या वस्तूंवर खर्च करत असाल तर. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. व्यवसाय किंवा नोकरीच्या संदर्भात तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा महिना चढ-उतारांनी भरलेला राहील. व्यावसायिक जीवनात समाधानकारक प्रगती कराल. तुम्हाला सहकारी किंवा वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. कामाच्या ठिकाणी गोंधळ होऊ शकतो किंवा कुटुंबात एखाद्या मुद्द्यावरून तणाव निर्माण होऊ शकतो.
धनु राशीसाठी हा महिना व्यस्त किंवा आव्हानांनी भरलेला राहील. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुमच्यावर कामाचा ताण येऊ शकतो. तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त काम करावे लागू शकते. तुम्हाला मानसिकदृष्ट्या थकवा किंवा एकटेपणा जाणवू शकतो. हळूहळू सर्व समस्या दूर होतील.
मकर राशीच्या लोकांसाठी हा महिना चांगला राहील. या महिन्यामध्ये कुटुंब आणि घरगुती जीवनाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना सौहार्द राखणे आवश्यक असेल. तुम्हाला कठोर मेहनत घ्यावी लागेल. तुमच्यावरील कामावरील ताण वाढू शकते. संयम आणि समजूतदारपणा खूप महत्त्वाचा असेल.
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा महिना मिश्रित राहील. कौटुंबिक खर्चात वाढ होईल, ज्यामुळे तुमच्या बजेटवर परिणाम होऊ शकतो. घरातील गरजा आणि अनपेक्षित खर्च यांचा समतोल साधणे आव्हानात्मक असेल. आर्थिक योजना आखणे फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमचा ताण जास्त राहील. व्यावसायिक महिलांना काम आणि घराचे संतुलन साधण्यात अडचण येऊ शकते. कामाचा ताण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळणे आव्हानात्मक असू शकते. तुम्हाला मानसिक ताण जाणवू शकतो.
मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. तुमच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील, जे तुमच्यासाठी अनेक क्षेत्रांमध्ये फायदेशीर ठरतील. तुमच्या करिअर किंवा व्यवसायात उपयुक्त ठरेल. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित गोष्टींमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. मालमत्ता खरेदी किंवा विक्री, भाड्याने देणे किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या व्यवहारात नफा मिळण्याची शक्यता आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)