फोटो सौजन्य- pinterest
वास्तुशास्त्रानुसार, जे लोक जीवनामध्ये खूप मेहनत घेतात मात्र त्यांना अपेक्षित यश आणि आनंद मिळत नाही. प्रत्येक गोष्टीत यश मिळण्यासाठी करा हे उपाय. कोणते आहेत ते उपाय जाणून घ्या
अनेक लोकांच्या जीवनात दिवसभर मेहनत करूनही त्यांना आनंद मिळत नाही. त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा वेळी आपण वास्तूशास्त्राची मदत घेणे फार गरजेचे असते. वास्तुशास्त्रानुसार, सकाळी उठताना काही गोष्टी दिसणे अशुभ मानले जाते. सकाळी उठल्यानंतर या गोष्टी दिसल्यास व्यक्तीच्या जीवनामध्ये नकारात्मकता येते. त्यामुळे अशा काही गोष्टी पाहणे टाळावे.
वास्तुशास्त्रात सकाळी उठताच घाणेरडी भांडी दिसणे अशुभ मानले जाते. रात्रीची करकटी भांडी अशीच ठेवल्यास देवी अन्नपूर्णा रागावते आणि त्या ठिकाणी तिचा वास राहत नाही. म्हणून अशी चूक करू नका नाहीतर घरात गरिबी वाढेल. रात्री झोपण्यापूर्वी भांडी धुवून ठेवा. व्यक्तीच्या मनामध्ये तणाव आणि गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणे सकाळी उठताच आरशात आपला चेहरा पाहण्याची सवय असल्यास ती दूर करा असे करणे खूप शुभ असते.
घरात बंद पडलेले किंवा खराब झालेले घड्याळ वापरू नये असे करणे वास्तुशास्त्रानुसार असे करणे चांगले मानले जात नाही. जर एखाद्या व्यक्तीने सकाळी उठताच तुटलेल्या किंवा बंद घड्याळात वेळ पाहिली तर जीवनात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे अशी चूक कधीही करु नये. घरामध्ये घड्याळ बंद असणे हे योग्य मानले जात नाही.
वास्तुशास्त्रात सकाळी उठल्याबरोबर स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या सावलीकडे पाहण्यास मनाई आहे. ज्यामुळे तुम्हाला समस्यांना तोंड द्यावे लागेल नाहीतर तुमचा दिवस खराब जाऊ शकतो. ज्यामुळे व्यक्तीमध्ये भीती, तणाव आणि गोंधळ निर्माण होऊ शकतो.
हिंदू धर्मामध्ये सकाळी उठल्यानंतर देव-देवतांच्या प्रार्थनेने दिवसाची सुरुवात करणे शुभ मानले जाते. शास्त्रांमध्ये लोकांनी सकाळी आवरुन झाल्यानंतर सूर्यदेवाला पाणी अर्पण करावे आणि त्यांच्या देवतेची पूजा करताना त्यांना त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण कराव्यात.
अशा काही गोष्टी केल्याने दिवसाची सुरुवात चांगली होते. त्यामुळे व्यक्तीच्या सर्व समस्यांपासून मुक्त होते आणि जीवनात समृद्धी येते. मात्र मंदिरात जाणे किंवा श्रद्धेनुसार गरिबांना अन्न, कपडे आणि धान्य दान करणे देखील फायदेशीर ठरते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)