फोटो सौजन्य- pinterest
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला राधा अष्टमीचा सण साजरा केला जातो. यावेळी ही तिथी आज रविवार, 31 ऑगस्ट रोजी आहे. मान्यतेनुसार, या दिवशी ब्रजची पूजनीय अधिष्ठात्री देवी श्री राधा राणी अवतारित झाली होती. हा सण जन्माष्टमीनंतर बरोबर 15 दिवसांनी साजरा केला जातो. शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की राधेचे नाव श्रीकृष्णापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण राधा ही कृष्णापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग आहे. राधा अष्टमीचे व्रत केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात, वैवाहिक जीवन आनंदी होते आणि संततीचे सुख मिळते. राधाअष्टमीच्या दिवशी कोणत्या भाज्या आणि फळे खावू नये, जाणून घ्या
श्रद्धेनुसार, राधाष्टमीचे व्रत केल्याने जन्माष्टमीच्या व्रतासारखेच पुण्य मिळते. राधाष्टमीचा दिवस अत्यंत शुभ असतो. इतर सणांप्रमाणे या दिवशीही काही खाण्याच्या सवयींचे पालन करावे लागते. असे मानले जाते की या नियमांचे पालन केल्याने जीवनात नेहमीच आनंद आणि शांती राहते. जर नियमांचे उल्लंघन केल्यास तुम्हाला नुकसानाला त्रासाला सामोरे जावे लागते.
जे लोक उपवास करतात ते लोक विशिष्ट आहाराचे सेवन करतात. हे नियम ज्योतिष आणि आयुर्वेदामध्ये सांगण्यात आले आहे. त्यामुळे आपण प्रत्येक ऋतूमध्ये आजारांपासून दूर राहू शकतो. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत राहू शकता. आयुर्वेदानुसार जरी तुम्ही राधाअष्टमीच्या दिवशी उपवास करत नसाल तरी या दिवशी आंबट पदार्थाचे सेवन करु नये. असे करणे अशुभ मानले जाते. अन्नासोबतच मांसाहारी, तुरट आणि मादक पदार्थ देखील टाळावेत.
राधाष्टमीला मेथी, भोपळा आणि वांगी या भाज्या खावू नये, पावसाळ्यात या भाज्या खाणे हानिकारक मानले जाते. या तीन भाज्या तामसिक मानल्या जातात म्हणून राधाअष्टमीच्या दिवशी या तीन भाज्यांचे सेवन करु नये. राधा अष्टमीसारख्या दिवशी टरबूज आणि द्राक्षे यांसारखी जास्त पाणी असलेली फळे खाणे टाळावे. कारण या पाण्यामुळे आजार आणि अपचनाच्या समस्या होण्याची शक्यता जास्त असते.
राधा अष्टमीच्या दिवशी दान, भजन-कीर्तन आणि कुमारिकांना पूजा करुन त्यांना खायला द्या त्यामुळे ग्रहांचे असलेले अशुभ परिणाम दूर होण्यास मदत होते. नातेसंबंधांमध्ये सुसंवाद आणि स्थिरता आणण्यासाठी हा दिवस खूप फायदेशीर मानला जातो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)