फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार, शनि ग्रहाला कर्माचा कर्ता मानला जातो. यावेळी तो मंद गतीने फिरतो आणि त्याच्या प्रभावामुळे लोकांच्या जीवनात अनेक बदल होताना दिसून येतील. शनिचा प्रभाव जसा सर्व राशीच्या लोकांवर असतो तसा त्याच्या कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी युतीत राहतो. शनि ग्रह सध्या मीन राशीमध्ये स्थित आहे. त्याच्या या वक्रीमुळे तो शक्ती आणि प्रभाव वाढतो.
यावेळी 31 जुलै रोजी शनि आणि गुरु एकमेकांपासून 100 अंशांच्या अंतरावर असल्याने शतंक योग तयार होणार आहे. यालाच इंग्रजीमध्ये सेंटाइल संयोजन असे देखील म्हणतात. या तयार होणाऱ्या योगामुळे काही राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश, आदर आणि प्रतिष्ठा मिळू शकते तर काही राशीच्या लोकांना या काळामध्ये करिअर, आर्थिक स्थिती आणि वैयक्तिक विकासात सकारात्मक बदल आणतो. कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी जाणून घ्या
शनि आणि गुरुच्या शतंक योगाचा फायदा वृषभ राशीच्या लोकांना होणार आहे. बऱ्याच काळापासून रखडलेल्या कामांना गती मिळेल आणि तुमची कामे यशस्वी होतील. या योगामुळे तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळू शकतील. तसेच तुम्हाला आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती देखील स्थिर राहील. घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. व्यावसायिकांना अपेक्षित यश मिळेल. एखाद्या योजनेत गुंतवणूक केली असल्यास तुम्हाला त्याचा फायदा होईल. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर चांगले लक्ष केंद्रित करू शकतील त्यामुळे त्यांना परीक्षेमध्ये चांगले यश मिळेल.
मकर राशीच्या लोकांसाठी शनि आणि गुरुचा शतंक योग खूप फायदेशीर राहणार आहे. यावेळी तुमची दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ खूप चांगला राहील. जुन्या आजारांपासून आराम मिळू शकतो. व्यवसायाशी संबंधित असलेल्या लोकांना अनेक फायदे होऊ शकतात. कामाच्या निमित्ताने तुम्ही प्रवास करु शकतात. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ शांती आणि समृद्धीचा राहील.
शनि आणि गुरुचा शतंक योग कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. या योगामुळे जीवनात आनंदाचे वातावरण राहील. तसेच आर्थिक लाभ देखील होऊ शकतात. कुटुंबाशी असलेले संबंध दृढ होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर राहील. या लोकांना परदेशी कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. व्यापारातही चांगल्या संधी उपलब्ध होतील. त्याचसोबत वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती स्थिर राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)