फोटो सौजन्य- istock
यंदा रक्षाबंधन शनिवार, 9 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी मूळ अंक असलेल्या लोकांसाठी हा दिवस शुभ ठरणार आहे. यावेळी व्यक्तीच्या जीवनात अनेक शुभ घटना घडू शकतात. या सणांच्या दिवशी 1, 3, 5, 6 किंवा 9 या तारखेल्या जन्मलेल्या लोकांचा दिवस खूप खास असणार आहे. कारण या दिवशी काही लोकांना आनंदाची बातमी मिळू शकते. रक्षाबंधनाचा दिवस काही मूलांकांच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे. तुम्ही आपल्या मूलांकांनुसार त्या दिवशी योग्य रंगांचे कपडे परिधान करणे शुभ राहील. या मूलांकांच्या लोकांसाठी रक्षाबंधनाचा दिवस कसा राहील, जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांना नवीन नोकरी मिळू शकते. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला आहे अशा लोकांनी रक्षाबंधनाच्या दिवशी निळ्या रंगांचे कपडे परिधान करावे. असे करणे या लोकांसाठी फायदेशीर राहील.
रक्षाबंधनाच्या दिवशी मूलांक 3 असलेले लोक वाहनाची खरेदी करु शकतात. या दिवशी तुम्ही नवीन गाडीची खरेदी करु शकता. हा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. यावेळी 3, 12, 21 किंवा 30 या तारखेला जन्मलेल्या लोकांनी रक्षाबंधनाच्या दिवशी लाल रंगांचा वापर करावा. ते तुमच्यासाठी शुभ राहणार आहे.
मूलांक 5 असलेल्या लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये चांगले यश मिळू शकते. 5, 14 किंवा 23 तारखेला जन्म झालेल्या लोकांना रक्षाबंधनाच्या दिवशी तपकिरी रंगाचा वापर करावा. हा दिवस तुमच्यासाठी खूप फायदेशीर राहील.
रक्षाबंधनाच्या दिवशी मूलांक 6 असणाऱ्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो. या लोकांना शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. यावेळी तुम्ही मालमत्ता देखील खरेदी करु शकता. व्यवसाय करणाऱ्यांना भागीदारीमध्ये करण्यासाठी चांगली संधी मिळेल. कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल.
मूलांक 9 असलेल्या लोकांना बक्षीस मिळण्याची शक्यता आहे. तुमची भेट एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी होऊ शकते, जो भविष्यात तुम्हाला मदत करेल. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला झालेला आहे त्यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी पीच रंगांचा वापर करावा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)