फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मात नवरात्रीचा सण खूप पवित्र मानला जातो. वर्षातून चार वेळा येणारा हा सण देवी दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांच्या पूजेचे प्रतीक मानले जाते. नवरात्रीची सुरुवात होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या उपासनेत दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की दिवा लावल्याने केवळ पर्यावरण शुद्ध होत नाही तर देवीचे आशीर्वाद देखील मिळतात. विशेष करुन कापूरचा दिवा लावणे खूप फायदेशीर ठरते. यामुळे केवळ सकारात्मक ऊर्जाच नाही तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा देखील प्रवेश करते.
नवरात्रीमध्ये देवीची पूजा करताना प्रत्येक वेळी नियम आणि परंपरा यांचे पालन केल्याने आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा हा संदेश असतो. दिवा लावणे हा परंपरेमधील एक अविभाज्य भाग मानला जातो. सहसा घरांमध्ये तूप किंवा तेलाचे दिवे लावले जातात. मात्र आपण या काळामध्ये घरामध्ये कापूरचा दिवा लावल्याने त्याचे आणखी महत्त्व वाढते. हिंदू धर्मात कापूरला पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. कापूरचा वापर केल्याने घरामधील वातावरण देखील शुद्ध राहते. कापूर जाळल्यावर निघणारा धूर घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास मदत करते. कापूरच्या सुंगधामुळे मन आणि मेंदूला शांती प्रदान करतो.म्हणूनच नवरात्रीत दररोज देवीच्या पूजेदरम्यान कापूरचा दिवा लावणे फायदेशीर मानले जाते.
बाजारात सहज उपलब्ध असणारी तुपाची वात अनेकदा भेसळयुक्त असू शकते. त्यामुळे शुद्ध देशी तुपाने घरी तयार करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. शुद्ध तुपापासून बनवलेल्या वातीमध्ये कापूर मिसळून दिवा लावला तर त्याचा परिणाम अनेक पटींनी वाढतो. हे घरातील वातावरण शुद्ध करते आणि सकारात्मकता पसरवते. असे देखील म्हटले जाते की, या दिव्याने देवी प्रसन्न होते आणि भक्ताला आशीर्वाद देते.
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दररोज देवीच्या वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते. प्रत्येक दिवसाला स्वतःचे असे वेगळे महत्त्व आहे आणि त्याची पूजा केली जाते. जर दररोज पूजा करताना कापूरचा दिवा लावल्यास घरामध्ये सुख, समृद्धी, शांती आणि आरोग्य प्राप्त होते. कापूरचा दिवा लावल्याने केवळ अध्यात्मिक फायदेच होत नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही फायदे होतात. कापूरमध्ये असलेले औषधी गुणधर्म वातावरणात असलेल्या हानिकारक जंतूंचा नाश करतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)