फोटो सौजन्य- pinterest
22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात झाली आहे. हिंदू धर्मात या नऊ दिवसांना विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या या काळामध्ये पूजा आणि उपवास करण्यासोबतच काही विशिष्ट तारखेला वाहन खरेदी करण्याला देखील महत्त्व आहे. जे लोक नवीन गाडी खरेदी करण्याचा किंवा नवीन काम सुरू करण्याचा विचार करत आहेत ते नवरात्रीत हे करू शकतात. नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये वाहनांची खरेदी केल्यास शुभ परिणाम मिळतात आणि व्यक्तीची प्रगती देखील होते. नवरात्रीमध्ये वाहन खरेदी करण्यासाठी काय आहे शुभ मुहूर्त, जाणून घ्या
शनिवार, 27 स्पटेंबरचा दिवस वाहन खरेदी करण्यासाठी खूप शुभ आहे. हा नवरात्रीचा पाचवा दिवस असेल. या काळात अनुराधा नक्षत्रामध्ये अभिजित मुहूर्ताच्या वेळी नवीन वाहन खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या काळात तुम्ही घरगुती वस्तू, काही नवीन मालमत्ता इत्यादी देखील खरेदी करू शकता.
27 सप्टेंबर व्यतिरिक्त तुम्ही नवरात्रीच्या सातव्या दिवशी म्हणजे सप्तमीच्या दिवशी वाहने, मालमत्ता, फर्निचर इत्यादी गोष्टींची खरेदी करु शकता. सोमवार, 29 सप्टेंबर रोजी मूळ नक्षत्रामध्ये म्हणजे अभिजित मुहूर्तावर तुम्ही वाहनांची खरेदी करु शकता. असे करणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते आणि देवीचे कुटुंबातील सदस्यांवर आशीर्वाद राहते.
जर तुम्ही नवीन व्यवसाय किंवा उपक्रम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर यासाठी दसऱ्याचा दिवस सर्वोत्तम मानला जातो. हा दिवस गुरुवार, 2 ऑक्टोबर रोजी आहे. अशावेळी उत्तराषाढा आणि श्रावण नक्षत्रातील अभिजित मुहूर्ताच्या वेळी नवीन प्रकल्पाची सुरुवात करु शकते आणि नवीन वाहनांची देखील खरेदी करु शकता. त्यामुळे तुम्हाला प्रगती होण्यास खूप मदत होते.
जर तुम्ही नवरात्र किंवा दसऱ्याच्या वेळी वाहनाची खरेदी करु शकत नसाल तर विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 ऑक्टोबर रोजी तुम्ही वाहनांची खरेदी करु शकता. श्रावण आणि धनिष्ठा नक्षत्रांच्या संयोगामुळे या दिवशी वाहनांची खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. नवीन उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी किंवा वाहन, फर्निचर, मालमत्ता इत्यादी खरेदी करण्यासाठी देखील हा काळ खूप चांगला आहे.
हिंदू धर्मामध्ये नऊ दिवस खूप विशेष आणि पवित्र मानले जातात. नवरात्रीच्या या दिवसांमध्ये शुभ वस्तूंची खरेदी केल्याने घरामध्ये आनंद आणि समृद्धी येऊ शकते. तसेच देवीचा आशीर्वाद देखील मिळू शकतो. नवरात्रीत नवीन कामाची सुरुवात केल्यास देवीच्या आशीर्वादाने प्रगती होईल आणि आनंदही वाढतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)