फोटो सौजन्य- pinterest
सूर्य-शनि समसप्तक योग तयार करणार आहे. जो ग्रहांचा राजा सूर्याच्या कन्या राशीत संक्रमण करणार आहे. 17 सप्टेंबर रोजी सूर्य कन्या राशीत आहे तर 17 ऑक्टोबर रोजी तो तूळ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यासोबतच योगाचा प्रभावही संपेल. सूर्य सध्या कन्या राशीत आहे तर शनि मीन राशीत आहे यामुळे शनि सूर्यापासून सातव्या घरात आहे. सूर्य आणि शनि यांच्यातील ही युती सुमारे 30 वर्षांनी होणार आहे. ज्यामुळे या राशीच्या लोकांना महिनाभर चढ उताराचा सामना करावा लागू शकतो. या राशीच्या लोकांना वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात. तसेच तुमची अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. 30 वर्षांनंतर तयार होणाऱ्या सूर्य-शनि समसप्तक योगाचा कोणत्या राशीच्या लोकांवर परिणाम होणार, जाणून घ्या
जेव्हा दोन ग्रह एकमेकांच्या विरुद्ध असतात त्यावेळी समसप्तक योग तयार होणार आहे. हा योग सूर्य आणि शनि यांच्यामध्ये हा योग तयार होणार आहे. सूर्य कन्या राशीत आहे तर शनि मीन राशीमध्ये आहे. त्यामुळे याचा प्रभाव काही राशीच्या लोकांवर होणार आहे.
मेष राशीच्या कुंडलीमध्ये सूर्य-शनि समसप्तक योग सहाव्या घरामध्ये तयार होत आहे. यामुळे आरोग्य, कामाच्या ठिकाणी स्पर्धा, कर्ज, लपलेले शत्रू, वेगळे होणे किंवा परराष्ट्र व्यवहारांशी संबंधित ताण यासारखी आव्हाने येऊ शकतात. वरिष्ठांशी किंवा तुमच्या वडिलांशी गैरसमज झाल्यामुळे नातेसंबंध ताणले जाऊ शकतात.
सिंह राशीच्या कुंडलीमध्ये सूर्य-शनि समसप्तक योग दुसऱ्या घरामध्ये होत आहे. या युतीमुळे भागीदारी, विवाह आणि व्यावसायिक संबंधांमध्ये संघर्ष होऊ शकतो. आरोग्य आणि वैयक्तिक उर्जेवरही देखील परिणाम होऊ शकतो. पैशांचे व्यवहार करताना या काळात काळजी घ्या. तुमचे पैसे अडकू शकतात.
कन्या राशीच्या कुंडलीमध्ये सूर्य-शनि समसप्तक योग पहिल्या घरामध्ये होत आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना तणावाचा सामना करावा लागू शकतो. वैयक्तिक इच्छा आणि प्रवृत्ती इतरांच्या जबाबदाऱ्या आणि अपेक्षांशी संघर्ष करू शकतात. आरोग्य आणि सहनशक्तीमध्ये चढ-उतार येऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात.
मीन राशीच्या कुंडलीमध्ये सूर्य-शनि समसप्तक योग सातव्या घरामध्ये होत आहे. या राशीच्या लोकांना स्पर्धा किंवा कायदेशीर वादांना सामोरे जावे लागू शकते. तसेच या काळामध्ये तुम्हाला कामासाठी खूप धावपळ करावी लागू शकते. तसेच तुम्हाला आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागेल. या काळात तुमचे बजेट बिघडू शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)