फोटो सौजन्य- pinterest
नवरात्रीच्या चौथा दिवस कुष्मांडा देवीला समर्पित आहे. देवीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. यावेळी देवीच्या चौथ्या रुपांची पूजा केली जाते. या दिवशी भक्ताचे मन ‘अनहत चक्रात’ स्थित असते, म्हणून भक्ताने देवीचे ध्यान करावे आणि अत्यंत पवित्रतेने आणि शुद्ध भावनेने तिची पूजा करावी त्यामुळे या देवीला कुष्मांडा असे म्हटले जाते. तिच्या सौम्य आणि कोमल हास्याने “अंडी” म्हणजेच विश्वाची निर्मिती केली. ज्यावेळी विश्व अस्तित्वात नव्हते आणि सर्वत्र अंधार पसरला होता त्यावेळी देवीने तिच्या हलक्या हास्याने विश्वाची निर्मिती केली, असे म्हटले जाते.
देवी कुष्मांडा ही सृष्टीची आदिम शक्ती मानली जाते. तिच्या आधी विश्व अस्तित्वात नव्हते. तिचे निवासस्थान सूर्यमालेत असल्याचे मानले जाते. सूर्याच्या विश्वात राहण्याची शक्ती फक्त तिच्यामध्येच असते. शरीरात सूर्याचीच तेजस्विता असते. तिच्या तेजाची बरोबरी इतर कोणताही देव किंवा देवी करू शकत नाही. तिच्या प्रकाशाने दहाही दिशा प्रकाशित होतात.
कुष्मांडा देवीला आठ हात आहेत. तिच्या सात हातामध्ये कमंडलू म्हणजे पाण्याचे भांडे, धनुष्यबाण, कमळाचे फूल, अमृताने भरलेला घडा, चक्र आणि गदा आहे. तर आठव्या हातामध्ये एक जपमाळ आहे. ज्याचा संबंध सर्व सिद्धी आणि संपत्तीशी आहे. तिचे वाहन सिंह आहे जे शक्ती आणि धैर्याचे प्रतीक मानले जाते.
देवीची पूजा केल्याने भक्ताचे मन शुद्ध होते आणि त्यांना भक्तीच्या मार्गावर पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. देवीच्या आशीर्वादाने, भक्ताला जीवनसागर पार करणे सोपे होते. कुष्मांडा देवी अगदी कमीत कमी सेवेने आणि साध्या भक्तीनेही प्रसन्न होते. खऱ्या मनाने तिचा आश्रय घेणारा भक्त सांसारिक आणि आध्यात्मिक प्रगती साध्य करू शकतो.
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कलशाची पूजा केली जाते त्यानंतर कुष्मांडा देवीला आवाहन केले जाते. तिला फळे, फुले, धूप आणि नैवेद्य अर्पण केले जाते. नंतर ब्राम्हणाला मालपुआ अर्पण करणे शुभ मानले जाते. पूजा झाल्यानंतर देवीचा आशीर्वाद घेऊन नैवेद्य सर्वांना वाटा. यामुळे ज्ञान, कौशल्ये आणि बुद्धी वाढते, असे म्हटले जाते.
सुरासम्पूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च।
दधाना हस्तपद्माभ्यां कूष्माण्डा शुभदास्तु मे॥
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)