फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये पूजा आणि प्रार्थनेला विशेष महत्त्व आहे. दररोज सर्वजण आपल्या घरामध्ये पूजा करतो. पण नवरात्रीमध्ये केलेली पूजा विशेष मानली जाते. हिंदू धर्मामध्ये प्रार्थना आणि उपासना ही देवाला संदेश पोहोचवण्याचा आणि त्याचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे देवाची पूजा केल्याने कुंटुबामध्ये आनंद आणि समृद्धी सुनिश्चित होते. जर तुम्हाला पूजेदरम्यान या गोष्टी दिसल्यास तुमची पूजा यशस्वी होत आहे, असे मानले जाते. कोणत्या आहेत त्या गोष्टी, जाणून घ्या
सध्या नवरात्रोत्सव सुरु आहे. या काळात देवीची पूजा आणि आदर केला जातो. दिवाळी आणि इतर अनेक प्रमुख सणही काही दिवसांतच साजरा करण्यात येणार आहे. सण आणि उत्सवांमध्ये देवतांची पूजा केली जाते. पूजा नेहमीच योग्य विधीपूर्वक केली जाते आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होईल.
पूजेदरम्यान देव किंवा देवी भक्ताच्या भक्तीने प्रसन्न होतात. पूजेदरम्यान दिव्याच्या ज्योतीमध्ये तयार होणारे आकार देखील शुभ संकेत घेऊन येतात. दिव्याच्या ज्योतीमध्ये फूल, त्रिशूळ किंवा चक्र दिसणे म्हणजे तुमची पूजा यशस्वी झाली आहे. दरम्यान, अधिक तेजस्वी किंवा जास्त उंच ज्योती अर्थ देखील असा होतो की, देव तुमच्या भक्तीवर प्रसन्न आहे.
देवीची पूजा करताना किंवा प्रार्थना करताना अचानक डोळ्यातून अश्रू वाहू लागल्यास तुमची पूजा यशस्वी झाली आहे आणि तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळणार आहेत, असे म्हटले जाते. पूजेदरम्यान तुमच्या घरात सुगंध आणि ताजेपणा जाणवत असल्यास देवाचे आशीर्वाद मिळविण्यासाठी शुभ संकेत मानले जातात.
पुजेदरम्यान देवाच्या मूर्ती किंवा चित्रावरून फुले पडताना दिसल्यास हे एक शुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ असा मानला जातो की, देवतांनी तुमची पूजा स्वीकारली आहे, असे मानले जाते.
हिंदू धर्मात, पाहुण्याला अतिथी म्हणतात. जर तुम्ही पूजा करत असताना तुमच्या घरी पाहुणे आले तर ते पूजा यशस्वी झाल्यास हे शुभ लक्षण मानले जाते. त्याचवेळी जर पूजेदरम्यान तुमच्या घरासमोर पांढरी गाय आलेली दिसण्याचा अर्थ तुमची पूजा यशस्वी होणे असा होतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)