Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sheetla Saptami 2025: कधी आहे शीतला सप्तमी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, नियम, उपाय

शीतला मातेचे रूप शीतलता प्रदान करणारे मानले जाते. शीतला अष्टमीच्या दिवशी जो कोणी देवीची खऱ्या मनाने व विधीपूर्वक पूजा करतो, त्याचे सर्व त्रास दूर होतात आणि त्याचे सर्व रोग बरे होतात. असे मानले जाते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 21, 2025 | 04:55 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

होळीच्या सात दिवसानंतर शीतला सप्तमीचे व्रत पाळले जाते. या दिवशी देवी शीतलाची पूजा केली जाते. शितला सप्तमीला बसोडा असेही म्हणतात. हिंदू पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची सप्तमी तिथी शीतला सप्तमीला साजरी केली जाते. यंदा शीतला सप्तमी शुक्रवार, 21 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. सनातन धर्मात माता शीतला ही सर्व इच्छा पूर्ण करणारी देवी म्हणून पूजली जाते. या दिवशी माता शितलाला शिळे अन्न अर्पण केले जाते. शीतला माता शीतलता देणारी देवी आहे असे म्हटले जाते. त्यांची पूजा केल्याने आरोग्याचे वरदानही मिळू शकते, असे सांगितले जाते.

शीतला सप्तमी शुभ मुहूर्त

शीतला सप्तमी तिथीची सुरुवात सकाळी 2.45 मिनिटांनी होईल आणि तिथीची समाप्ती शनिवार, 22 मार्चला सकाळी 4.23 मिनिटांनी होईल. उद्यतिथीनुसार, हे व्रत शुक्रवार 21 मार्च रोजी पाळले जाणार आहे.

शीतला सप्तमी पूजा मुहूर्त- शुक्रवार 21 मार्च रोजी सकाळी 6.24 पासून ते 6.23 मिनिटांपर्यंत असेल. तसेच शीतला सप्तमीच्या दिवशीही रवि योग जुळून येतो. या योगात देवी शीतलाची पूजा केल्याने निरोगी आयुष्याचा आशीर्वाद मिळतो.

Astrology: दिव्याची वात पूर्णपणे जळण्याचा नेमका अर्थ काय?

शीतला सप्तमी पूजा पद्धत

शीतला सप्तमीच्या दिवशी सकाळी सूर्योद्यापूर्वी उठून थंड पाण्याने आंघोळ करावी. शीतला सप्तमीच्या दिवशी देवी शीतलाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी व्रताचा संकल्प करा. त्यानंतर शीतला देवीच्या देवळात जाऊन तिला शुद्ध पाणी अर्पण करा. देवीची विधिवत पूजा करा. त्यानंतर देवीला शिळे अन्न अर्पण करावे. देवी शीतलाला गूळ आणि गोड तांदूळापासून बनवलेले पदार्थ खूप आवडतात त्यामुळे तुम्हीही या वस्तू अर्पण करु शकता. यानंतर देवीला लाल रंगाची फुले अर्पण करा.

शीतला सप्तमीचे नियम

शीतला मातेला अर्पण करण्यासाठी आदल्या रात्री हरभरा डाळ पाण्यात भिजवावी. लक्षात ठेवा की, देवीला नेहमी थंड पदार्थांचा प्रसाद अर्पण केला जातो म्हणून आदल्या दिवशी प्रसाद तयार ठेवा. पूजा झाल्यानंतर शीतला देवीची कथा नक्की वाचावी. घरी परतल्यावर मुख्य दरवाजावर पाच वेळा हळदीने हात लावा.

Mahabharata War: श्रीकृष्णाची इच्छा असती तर महाभारताचे युद्ध टाळता आले असते का?

शीतला सप्तमी व्रताचे फायदे

दिवशी उपवास केल्याने कुटुंबातील सर्व सदस्यांना चेचक, ताप आणि डोळ्यांशी संबंधित आजारांपासून आराम मिळतो. विशेषत: लोक विविध रोगांपासून मुक्त होण्यासाठी या दिवशी उपवास करतात. मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी पालक या दिवशी शीतला मातेचे व्रत करतात. यासोबतच विवाहित महिलांनी आजचे व्रत करून शीतला मातेकडून अखंड सौभाग्याचे आशीर्वाद मिळवू शकतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Sheetla saptami 2025 shubh muhurat rule solution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 04:55 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Weekly Horoscope: ऑक्टोबर महिन्याचा तिसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या
1

Weekly Horoscope: ऑक्टोबर महिन्याचा तिसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

Numberlogy: नवरात्रीच्या नवव्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश
2

Numberlogy: नवरात्रीच्या नवव्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Ketu Transit: केतूच्या संक्रमणामुळे या राशींच्या अडचणी होतील दूर; नोकरी, गाडी घर घेण्याचे स्वप्न होईल पूर्ण
3

Ketu Transit: केतूच्या संक्रमणामुळे या राशींच्या अडचणी होतील दूर; नोकरी, गाडी घर घेण्याचे स्वप्न होईल पूर्ण

Papankusha Ekadashi 2026: पापांकुशा एकादशीला भगवान विष्णूंच्या या रूपाची केली जाते पूजा; जाणून घ्या महत्त्व
4

Papankusha Ekadashi 2026: पापांकुशा एकादशीला भगवान विष्णूंच्या या रूपाची केली जाते पूजा; जाणून घ्या महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.