
श्रद्धा आणि सबुरी हे दोन शब्द ऐकले किंवा वाचले की आपोआप हात जोडले जातात आणि डोळ्यांसमोर प्रतिमा उभी राहते ती साईबाबांची. फक्त महाराष्ट्रच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात साईंचे भक्त आहेत. शिर्डीच्या साईमंदिरात दरदिवशी लाखो भाविकांची गर्दी असते. साईनाथांनी त्यांच्या भक्तांना विश्वास, श्रद्धा, कर्म, संयम प्रपंच करताना किती महत्वाचे आहेत याबाबत मोलाची शिकवण दिली. साईनाथांची शिकवण कोणत्याही धर्माशी बांधलेली नसून मानवतेवर आधारित आहे. त्यांनी आयुष्यभर प्रेम, श्रद्धा आणि समता बंधूता यांचा संदेश दिला.
देव देवता म्हटले की, ते एका ठराविक धर्मात बांधले जातात मात्र साईबाबांना देवत्व जरी प्राप्त असलं तरी ते कधी एका धर्माचे नव्हते. साईंनी समाजाला मानवतावादाची शिकवण दिली, असं सांगितलं जातं. काही जाणकारांच्या मते असं देखील म्हटलं जातं की, साईनाथांनी सर्वधर्म समभावाचा अनोखा संदेश दिला. ते मस्जिदमध्ये राहून “अल्लाचा मालिक आणि रामाचा रघुनंदन एकच” आहे असे सांगत. म्हणूनच हिंदू–मुस्लिम ऐक्याचे ते जिवंत उदाहरण होते. त्यांच्या शिकवणीत धर्म नाही, तर मानवी मूल्यांना अधिक महत्त्व होते. ते म्हणायचे की, “मी मंदिरातही आहे आणि मस्जिदमध्येही, जो जिथे शोधतो तिथे मी आहे.”
साईबाबांच्या संपूर्ण तत्त्वज्ञानाचा सार ह्या दोन शब्दांत सामावलेला आहे ते म्हणजे
श्रद्धा आणि सबुरी” . ही फक्त उपदेशाचे शब्द नाहीत; तरआयुष्य कसं जगावं याचा मार्गदर्शक मंत्र आहे.
देवावर, आपल्या कर्मावर आणि आपल्या मार्गावर न ढळणारा विश्वास असणं. संकट आले तरी “देव माझ्यासोबत आहे” ही भावना कायम ठेवणं. निर्णय घेताना मनातील सकारात्मकतेवर टिकून राहणं. मनातील चांगुलपणा आणि प्रामाणिकतेवर विश्वास असणं. “श्रद्धा असेल तर वाट आपोआप मिळते.”म्हणजेच विश्वास असेल तर जीवनातील अडथळे सहज पार करता येतात.श्रद्धा म्हणजे देवावरचा, स्वतःवरचा आणि कर्मावरचा अढळ विश्वास.
साईनाथ म्हणायचे की, “माणसाने देवाकडे काही मागण्यासाठी नव्हे तर प्रेम व्यक्त करण्यासाठी जावं.” श्रद्धा असते तेव्हा मनातील भीती कमी होते, शंका नाहीशा होतात आणि आशावाद निर्माण होतो. जीवनात कितीही अंधार असला तरी श्रद्धा असली की माणूस पुढे चालत राहतो. श्रद्धा म्हणजे आंधळा विश्वास नव्हे; तर सत्य, प्रेम आणि चांगुलपणावरची दृढ निष्ठा आहे अशी शिकवण साईनाथांनी दिली.
सबुरी म्हणजे संयम, धीर, आणि योग्य वेळेची वाट पाहणं. कोणत्या कठीण काळात घाईघाईने निष्कर्ष काढू नका.प्रत्येक गोष्टीचा योग असतो. प्रामाणिक मेहनत घेऊनही हाती काहीच लागत नाही तेव्हा खरी संयमाची कसोटी असते. .आयुष्यात मिळणारी प्रत्येक गोष्ट ही योग्य वेळीच घडते. .अडचणी आल्या तरी स्थिर राहणं, तक्रार न करणं. प्रयत्न करत राहणं पण उतावळेपणा न करणं याला सबुरी म्हणतात.थोडक्यात काय तर सबुरी म्हणजे धीर धरल्यास आपल्याला जे हवे आहे ते योग्य वेळी नक्की मिळते हा विश्वास.
हे दोन शब्द एकत्र आल्यावर जीवनातील प्रत्येक अडथळा, भीती, शंका आणि काळजी सगळं कमी होतं. .श्रद्धा तुमचं मन मजबूत करतं आणि सबुरी तुमचा काळ सुंदर बनवते. “ आयुष्याच्या प्रवासात काही दरवाजे उशिरा उघडतात पण सबुरी ठेवली तर ते कामस्वरुपी बंद राहत नाहीत.
श्रद्धा माणसाला आयुष्यात हिंमतीने पुढे जाण्याचं बळ देते आणि सबुरी त्याला धीराने सामोरं जायला शिकवते. हे दोन गुण एकत्र आल्यावर मन स्थिर होते, विचार शुद्ध होतात आणि जीवन शांततेने भरून जाते.साईनाथांच्या मते, ज्याच्या मनात श्रद्धा आणि सबुरी आहे, तो कधीही एकटा राहत नाही. देव त्याच्या सोबत असतो, मार्ग दाखवतो आणि योग्य वेळी कृपा करतो.यातून स्पष्ट होतं की साईंचा हा जीवनमंत्र आजही लाखो लोकांसाठी समाधान, शक्ती आणि आत्मविश्वासाचा अखंड स्रोत आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: साईबाबांची शिकवण कोणत्याही एका धर्माशी बांधलेली नाही. ती शुद्ध मानवतेवर आधारित आहे. ते मंदिरातही आहेत आणि मस्जिदीतही—असं ते स्वतः सांगत.
Ans: साईनाथ मस्जिदीत राहून म्हणत—“अल्लाचा मालिक आणि रामाचा रघुनंदन एकच”. त्यांनी हिंदू–मुस्लिम ऐक्याचा जिवंत आदर्श दिला.
Ans: साईबाबांच्या मते श्रद्धा म्हणजे आंधळा विश्वास नव्हे; तर सत्य, प्रेम आणि चांगुलपणावरील अढळ निष्ठा.