फोटो सौजन्य- pinterest
मान्यतेनुसार, श्रावण महिना हा भगवान शिवांना खूप प्रिय मानला जातो. यावेळी भोलेनाथ आपल्या कुटुंबासह पृथ्वीवर विहार करण्यासाठी येतात. यामुळे शिवाशी संबंधात असलेल्या अनेक गोष्टी केल्या जातात. या काळात लोक मंदिरात जाऊन शिवलिंगावर जल अर्पण करणे, नामस्मरण करणे इत्यादी अनेक उपाय करतात. देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथन फक्त श्रावण महिन्यातच झाले होते अशी मान्यता आहे. ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यावेळी देव आणि दानवांमध्ये 14 रत्नांची निर्मिती झाली. यामध्ये देवी लक्ष्मी, ऐरावत हत्ती, भगवान धन्वंतरी, विष आणि अमृत यांचा समावेश आहे. ज्योतिषशास्त्रानुसार काही गोष्टी घरी आणल्यास आपले नशीब चमकते. कोणत्या गोष्टी घरी आणाव्यात, जाणून घ्या
मान्यतेनुसार श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगाची पूजा केल्याने मानवाचे सर्व दुःख आणि वेदना दूर होतात. या महिन्यात पूजा केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांवर त्यांचा आशीर्वाद राहतो. खासकरुन सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण केल्याने त्याचा भक्ताला विशेष फायदा होतो.
ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यावेळी भगवान धन्वंतरी हातात अमृताचे भांडे घेऊन बाहेर आले. हे अमृत पिण्यासाठी देव आणि दानवांमध्ये बराच काळ संघर्ष झाला. त्यानंतर भगवान विष्णूच्या कृपेने देवतांना अमृत मिळाले. अमृत कलश मिळणे अशक्य आहे परंतु त्याचे प्रतीक म्हणून तुम्ही तुमच्या घरात कलशाची स्थापना करू शकता. असे करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे भोलेनाथ तुमच्यावर प्रसन्न होऊ शकतात. तसेच धर्मामध्ये देवी लक्ष्मीच्या पूजेला देखील विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे. असे मानले जाते की, समुद्रमंथनातून देवी लक्ष्मीचा उदय झाला. त्यासोबतच या महिन्यात देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र घरात आणून लावणे फायदेशीर ठरेल. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते.
समुद्र मंथनामधून ऐरावत हत्ती देखील आला होता असे म्हटले जाते. ज्याला देवांचा राजा इृंद्रदेव याचे वाहन मानले जाते. जर तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतील आणि त्या पूर्ण करायच्या असतील, तुम्हाला आर्थिक स्थिती मजबूत करायची असल्यास तुम्ही घरी दगड किंवा स्फटिकाचा ऐरावत हत्ती घेऊन या. त्याला समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे घरामध्ये ही मूर्ती स्थापित करा. धर्मामध्ये शंखाला भगवान विष्णूंचे रुप मानले जाते. यावेळी शंखाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. विष्णूंच्या हातात दिसणारा शंख 14 रत्नांपैकी एक आहे ज्याला पंचजन्य शंख असे म्हटले जाते. श्रावण महिन्यात तुम्ही घरातील देव्हाऱ्यात शंख ठेवणे देखील फायदेशीर मानले जाते. तसेच महादेवांना अनेक फुले आवडतात त्यापैकी पारिजातचे फूल खास आणि महत्त्वाचे मानले जाते. कारण असे म्हटले जाते की तेही समुद्रमंथनाच्या वेळी बाहेर आले होते. हे फूल महादेवांना खूप प्रिय असल्याने ते त्यांना अर्पण केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. श्रावण महिन्यात पारिजातचे फूल घरामध्ये आणणे खूप शुभ मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)