फोटो सौजन्य- pinterest
श्रावण महिन्याची चाहुल लागतच असताना आता 70 वर्षानंतर ग्रहांचे दुर्मिळ संयोजन होताना दिसून येणार आहे. शनि, राहू, केतू आणि बुध हे ग्रह वक्री होणार आहेत याचा फायदा 4 राशीच्या लोकांना होणार आहे. ग्रह आणि नक्षत्राच्या दृष्टिकोनातूनही हे संक्रमण महत्त्वाचे असणार आहे. श्रावण महिन्यात एक – दोन नाही तर चार ग्रह वक्री होणे हे 70 वर्षांनंतर घडणार आहे. या वक्री गतीचा परिणाम सर्वच राशीच्या लोकांवर होणार आहे. मात्र, यामुळे काही राशीच्या लोकांना याचा सकारात्मक परिणाम होईल तर काहींना अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. या वक्रीचा कोणत्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या.
ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्याप्रमाणे, न्याय आणि कर्माचा प्रतीक असलेला शनि ग्रह सध्या मीन राशीमध्ये स्थित आहे आणि तो आता 28 नोव्हेंबरपर्यंत या राशीमध्ये राहणार आहे. तसेच ग्रहांचा राजा बुध 18 जुलै रोजी कर्क राशीमध्ये वक्री स्थित राहील आणि 11 ऑगस्टपर्यंत तिथेच राहील. राहू आणि केतू नेहमीच वक्री अवस्थेत जातात, सध्या राहू कुंभ राशीत आहे आणि केतू सिंह राशीत वक्री अवस्थेत आहे. मात्र आता होणारी 4 ग्रहांची वक्री 70 वर्षानंतर होत असल्याने वृषभ, कर्क, कन्या आणि मीन राशीच्या लोकांसाठी ही वक्री खूप फायदेशीर राहणार आहे.
4 ग्रहांची होणारी वक्री वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तसेच व्यावसायिकांसाठी हा काळ शुभ राहणार आहे. त्यामुळे विविध व्यवहारांमधून मोठा नफा मिळू शकतो. यावेळी या लोकांना नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतील. त्यासोबत कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. श्रावण महिन्यामध्ये या राशीच्या कुटुंबामध्ये धार्मिक वातावरण राहील. आर्थिक स्थिती देखील चांगली राहील.
4 ग्रहांच्या होणाऱ्या वक्रीमुळे कन्या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. या लोकांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. हे लोक घर आणि वाहन देखील खरेदी करु शकतात. यामुळे नोकरी करणाऱ्या लोकांच्या कामाच्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. विविध गुंतवणुकींमुळे अधिक फायदा होईल. जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर तुम्हाला फायदा होईल.
4 ग्रहांच होणारी वक्री मीन राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. हे लोक आपल्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवतील. व्यावसायिकांसाठी हा काळ खूप शुभ ठरेल. व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला फायदा होईल. तसेच विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांना ग्रहांच्या प्रभावामुळे करिअरमध्ये अनेक नवीन संधी मिळतील. नोकरीमध्ये तुम्हाला अनेक संधी उपलब्ध होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)