Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shravan 2025: आज पहिला श्रावणी शुक्रवार, जिवतीची पूजा करण्याची पूजा पद्धत जाणून घ्या

आज शुक्रवार, 25 जुलै रोजी श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे. त्याचसोबत आज पहिला श्रावणी शुक्रवार असल्याने या दिवशी जिवतीची देखील पूजा केली जाते. जिवतीची पूजा करण्याची योग्य पद्धत काय आहे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 25, 2025 | 08:14 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

श्रावण महिन्याची सुरुवात आजपासून होत आहे. श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात महादेवांसोबत जिवतीची देखील पूजा केली जाते. जिवतीला जिवंतिका असे देखील म्हटले जाते. या दिवशी श्रावणात येणाऱ्या शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते. जिवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची विशेष पूजा करण्यात येते. ही पूजा संततीच्या रक्षणासाठी केली जाते.

श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक वाराला विशेष असे महत्त्व असते. श्रावण सोमवार, मंगळवार या दिवशी मंगळागौर साजरी केली जाते. तसेच शुक्रवारचा दिवस जिवतीची पूजा करण्यासाठी समर्पित असल्याचे मानले जाते. मान्यतेनुसार ही पूजा संततीच्या रक्षणासाठी केली जाते. यावेळी जिवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि देवी लक्ष्मी विशेष पूजा करण्यात येते. श्रावणी शुक्रवारी जिवतीची पूजा कशी केली जाते? काय आहे यामागील विधी जाणून घ्या

यावेळी किती श्रावणी शुक्रवार आहेत

मान्यतेसह श्रावणात येणारा प्रत्येक शुक्रवार हा महादेवासह जिवतीला समर्पित आहे. आजपासून श्रावण सुरु होत असून आज पहिला श्रावणी शुक्रवार देखील आहे, तर दुसरा श्रावणी शुक्रवार 1 ऑगस्टला आहे, तिसरा श्रावणी शुक्रवार 8 ऑगस्टला आहे, तिसरा श्रावणी शुक्रवार, 15 ऑगस्टला आहे तर शेवटचा श्रावणी शुक्रवार, 22 ऑगस्ट रोजी आहे. या सर्व शुक्रवारच्या दिवशी जिवतीची विधीवत पूजा करुन तिला नैवेद्य दाखविला जातो. श्रावण महिन्यात जिवतीची पूजा कशी करावी आणि काय आहे तिचे महत्त्व.

Chandra Gochar: अमावस्येच्या दिवशी या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब, कर्क राशीत चंद्र करणार संक्रमण

जिवतीची पूजा करण्याची पद्धत

श्रावणी शुक्रवारी कुलदेवी आणि देवी लक्ष्मीसह जिवतीची पूजा करावी. यामध्ये फुले, आघाडा व दुर्वा या गोष्टी एकत्र करून केलेली माळ, हळदीकुंकू लावलेले 21 मण्यांचे कापसाचे गेजवस्त्र, गंध, हळदीकुंकू, तांदूळ लावून जिवतीची पूजा केली जाते.

त्याचसोबत पुरणाचे 5 – 7 किंवा 9 असे दिवे करून लक्ष्मीमातेची व जिवतीची आरती म्हटली जाते. विड्यांच्या पानांबरोबर सुपारी व फळे ठेवून दुध-साखर आणि चणे-फुटाण्याचा नैवेद्य दाखवला जातो.

जिवतीची पूजा झाल्यानंतर तिचे औक्षण करुन आरती म्हटल्यानंतर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण केले जाते. त्यांच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते.

Astrology: ऑगस्ट महिन्यात लक्ष्मी नारायण आणि गजलक्ष्मी योगामुळे या राशीच्या लोकांना होईल आर्थिक लाभ

काय आहे जिवतीची कथा

पौराणिक कथेमध्ये उल्लेख केल्यानुसार, मूळची राक्षसी असणारी जरा मगध देशात राहात होती. त्यावेळी मगधच्या राजाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असणारा पुत्ररत्न प्राप्त झाला. त्यामुळे जन्मताच त्याला राज्याबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी जरा राक्षसीनीने त्या बाळाचे दोन वेगवेगळे भाग एकत्र करुन त्या बाळाला पुन्हा जीवदान दिले. म्हणून ते बाळ जरासंध या नावाने ओळखले जाऊ लागले. यानंतर मगध राज्यात जरा राक्षसीनीचा महोत्सव केला गेला. तिला तेथील लोक मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा होऊ लागली. जिवंतिका पूजनामुळे घरात, आरोग्य, धन, सुख लाभते अशी मान्यता आहे.

श्रावणी शुक्रवारी जिवतीची पूजा करण्याचे महत्त्व

जिवतीची पूजा करतेवेळी जरे जीवन्तिके देवि बालयुक्ते प्रमोदिनी। रक्षाव्रते महाशक्ति पूर्णकामे नमोस्तुते।। हा श्लोक म्हटला जातो. श्रावणात येणाऱ्या चारही शुक्रवारी जिवतीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. जिवतीची ही पूजा मुलांच्या संरक्षणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी आई करते. श्रावण महिन्याची सुरुवात होताच देव्हाऱ्याजवळ किंवा एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर जिवतीचे चित्र किंवा फोटो लावला जातो. याची दर शुक्रवारी पूजा केली जाते आणि देवीला नैवेद्य दाखवला जातो. पूजा करुन झाल्यावर मुलांना औक्षण करुन तो नैवेद्य वाण मुलांच्या हाताला लावला जातो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Shravan 2025 first shravan friday today know the rituals of jivati puja

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2025 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • Shravan 2025

संबंधित बातम्या

Palmistry: मधल्या बोटावर ‘ही’ ४ चिन्हे असल्यास व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचे आणि प्रतिभेचे रहस्य
1

Palmistry: मधल्या बोटावर ‘ही’ ४ चिन्हे असल्यास व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचे आणि प्रतिभेचे रहस्य

Nag Panchami Special: नागपंचमीला पोळी न बनवण्याची परंपरा का आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
2

Nag Panchami Special: नागपंचमीला पोळी न बनवण्याची परंपरा का आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Chanakya Niti: सुख-दुःखात साथ देणारा हाच खरा मित्र; चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी जाणून घ्या
3

Chanakya Niti: सुख-दुःखात साथ देणारा हाच खरा मित्र; चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी जाणून घ्या

Vinayak Chaturthi: श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
4

Vinayak Chaturthi: श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.