Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

Indira Ekadashi 2026: अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात. ही एकादशी पितृ पक्षात येते. या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि पूर्वजांना तर्पण व श्राद्ध करण्याशी संबंधित आहे. यावर्षी इंदिरा एकादशी कधी आहे, शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व आणि पितृपक्षाशी असलेला संबंध जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 30, 2026 | 11:45 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • इंदिरा एकादशी कधी आहे
  • इंदिरा एकादशीचा पितृपक्षाशी काय आहे संबंध
  • इंदिरा एकादशीचे काय आहे धार्मिक महत्त्व
सनातन धर्मामध्ये भगवान विष्णूच्या पूजेसाठी एकादशी विशेष मानली जाते. अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी इंदिरा एकादशी पितृपक्षात येत असल्यामुळे तिला अधिक महत्त्वपूर्ण मानले जाते. या दिवशी उपवास आणि विष्णूच्या पूजेसोबतच पूर्वजांना नैवेद्य आणि दान दिले जाते. जाणून घेऊया यावर्षी इंदिरा एकादशी केव्हा येते आणि या दिवशी उपवास व पूजेसाठी महत्त्वाच्या शुभ मुहूर्त कोणते आहेत.

इंदिरा एकादशी कधी आहे

वैदिक पंचांगानुसार, अश्विन कृष्ण एकादशी तिथीची सुरुवात मंगळवार ६ ऑक्टोबर रोजी पहाटे २:०७ वाजता सुरू होईल आणि ७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२:३४ वाजता संपेल. उदयतिथीनुसार, इंदिरा एकादशीचे व्रत मंगळवार, ६ ऑक्टोबर रोजी पाळले जाणार आहे.

Pitru Paksha: पितृपक्षात जन्मलेल्या मुलांचे कसे असते भविष्य? नशिबाची साथ मिळते की करावा लागतो अडचणींचा सामना

पूजा करण्यासाठी मुहूर्त

इंदिरा एकादशीच्या दिवशी ब्रम्ह मुहूर्त सकाळी ४:३९ ते ५:२८ पर्यंत असणार आहे. उपासनेची वेळ सकाळी ९:१३ ते दुपारी १:३७ पर्यंत आहे. लाभ-उन्नती मुहूर्त सकाळी १०:४१ ते दुपारी १२:०९ पर्यंत असेल. अमृत-सर्वोत्तम मुहूर्त दुपारी १२:०९ ते दुपारी १:३७ पर्यंत असेल. अभिजीत मुहूर्त सकाळी ११:४६ ते दुपारी १२:३३ पर्यंत असेल.

उपवास सोडण्याची काय आहे वेळ

इंदिरा एकादशीचा उपवास बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी सोडला जाणार आहे. उपवास सोडण्याची वेळ सकाळी ६:१७ ते सकाळी ८:३८ पर्यंत असेल. या दिवशी द्वादशी तिथी सकाळी ११:१६ वाजता संपेल.

सर्वार्थ सिद्धी योग

यावर्षी इंदिरा एकादशीला सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होत आहे. हा योग सकाळी ६:१७ ते रात्री १०:१७ पर्यंत राहील. हा योग शुभ कार्यांसाठी अनुकूल मानला जातो. दरम्यान, राहूकाळ दुपारी ३:०५ ते ४:३३ पर्यंत असेल.

Budh Vakri 2026: ऑक्टोबरमध्ये ‘या’ राशींचा वाढू शकतो ताण; व्यवसाय, नोकरी आणि आरोग्याबाबत राहा सावध

इंदिरा एकादशीचे धार्मिक महत्त्व

इंदिरा एकादशी ही पितृ पक्षातील महत्त्वाची एकादशी मानली जाते. असे मानले जाते की, या दिवशी भगवान विष्णूंची पूजा अर्चा केल्याने पितरांना शांती मिळते. त्यासोबतच कुटुंबावर त्यांचा आशीर्वाद राहतो. इंदिरा एकादशीच्या कथेत पूर्वजांच्या मुक्तीचा आणि भगवान विष्णूच्या आशीर्वादाचा उल्लेखही आहे. या दिवशी काही जण उपवास देखील करतात. भगवान विष्णू आणि शालिग्रामची पूजा करतात. त्यासोबतच पितरांसाठी तर्पण, श्राद्ध आणि दान करतात. धार्मिक श्रद्धेनुसार एकादशीच्या दिवशी हा उपवास मनुष्याला पापांपासून मुक्त होऊन मोक्ष मिळवण्याचा मार्ग मोकळा करतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Indira ekadashi auspicious time and religious significance pitru paksh relationship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Lord Vishnu

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात जन्मलेल्या मुलांचे कसे असते भविष्य? नशिबाची साथ मिळते की करावा लागतो अडचणींचा सामना
1

Pitru Paksha: पितृपक्षात जन्मलेल्या मुलांचे कसे असते भविष्य? नशिबाची साथ मिळते की करावा लागतो अडचणींचा सामना

Budh Vakri 2026: ऑक्टोबरमध्ये ‘या’ राशींचा वाढू शकतो ताण; व्यवसाय, नोकरी आणि आरोग्याबाबत राहा सावध
2

Budh Vakri 2026: ऑक्टोबरमध्ये ‘या’ राशींचा वाढू शकतो ताण; व्यवसाय, नोकरी आणि आरोग्याबाबत राहा सावध

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

Navratri 2026: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीही जव उगवले नाहीत? ‘हे’ संकेत दुर्लक्षित करू नका, लगेच करा ‘हा’ उपाय
4

Navratri 2026: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीही जव उगवले नाहीत? ‘हे’ संकेत दुर्लक्षित करू नका, लगेच करा ‘हा’ उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.