
फोटो सौजन्य- pinterest
या अमावस्येला वेगवेगळ्य नावांनी ओळखले जाते. अमावस्येच्या दिवशी नद्यांमध्ये स्नान करणे, दान करणे आणि पूर्वजांसाठी म्हणजेच पित्रांसाठी श्राद्ध करणे हे शुभ मानले जाते. ही अमावस्या श्रावण सुरु होण्यापूर्वी येते. या अमावस्येला दीप अमावस्या असे देखील म्हटले जाते. या अमावस्येला विशेष महत्त्व आहे.
श्रावण महिना सुरु होण्यापूर्वी येणारी अमावस्या तिथी सर्वांत खास मानली जाते. यावेळी भगवान शिवाची पूजा केली जाते. या महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या किंवा दीप अमावस्या असे म्हटले जाते. हिंदू धर्मामध्ये या अमावस्येला विशेष महत्त्व आहे. कारण हा अमावस्येचा दिवस पित्रांना समर्पित आहे. जर ही अमावस्या सोमवारी आल्यास त्याला सोमवती अमावस्या असे देखील म्हटले जाते. यंदा येणारी अमावस्या गुरुवार, 24 जुलै रोजी आहे या अमावस्येला दीप अमावस्या म्हणून ओळखले जाते. पित्रांच्या पूजेसोबतच यावेळी दिव्यांची देखील पूजा केली जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून नदीमध्ये आंघोळ केली जाते. त्यानंतर ध्यान धारणा केली जाते नंतर पूजा आणि दान करणे याला देखील विशेष महत्त्व आहे. श्रावण अमावस्या कधी आहे आणि मुहूर्त काय आहे, जाणून घ्या
यंदा अमावस्येची सुरुवात गुरुवार, 24 जुलै रोजी पहाटे 2.28 वाजता होणार आहे तर याची समाप्ती शुक्रवार, 25 जुलै रोजी दुपारी 12.40 वाजता होईल. यावेळी पूजा करण्यासाठी मुहूर्त सकाळी 5.38 ते सकाळी 7.20 पर्यंत असेल. ‘चर’ मुहूर्त सकाळी 10.35 पर्यंत राहील. त्यामुळे अमावस्या तिथी गुरुवार, 24 जुलै रोजी आहे.
यावेळी अमावस्येला हर्ष योगासह अनेक शुभ योगायोग तयार होत आहेत. त्यापैकी गुरु पुष्य योग, अमृत सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि शिववास योग हे प्रमुख योग तयार होणार आहेत. यावेळी दिव्यांची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.
श्रावण महिना सुरु होण्यापूर्वी येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. कारण या दिवशी पिठाच्या पदार्थांचा नैवेद्य देवीला दाखवण्याची परंपरा आहे. तसेच या दिवशी सुवाहासिनी मुलाबाळांसाठी देवींची पूजा करतात आणि चांगल्या आरोग्यासाठी आणि मुलांच्या सुखासाठी प्रार्थना करतात. या अमावस्येला ‘कुशाग्रहणी’ किंवा ‘दर्भग्रहणी’ अमावस्या देखील म्हटले जाते. या दिवशी संपूर्ण वर्षासाठी आवश्यक असलेले कुश म्हणजेच गवत गोळा केले जाते. धार्मिक कार्यांमध्ये कुश गवत ज्याला आपण दुर्वा म्हणतो ती महत्त्वाचे मानले जाते.
श्रावण अमावस्येला मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी पिठाचे पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. तसेच घरात तुपाचा दिवा लावावा. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करुन दिवा लावा. पिंपळाच्या झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घालून जलपूजन करताना नदीत 5 लाल फुले आणि 5 दिवे वाहत्या पाण्यात सोडा. यावेळी कन्यापूजन करून घरात किमान 9 मुलींना जेवू घालावे. पितृस्तोत्राचे पठण करणेदेखील शुभ मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)