फोटो सौजन्य- pinterest
रविवारचा दिवस सूर्य देवाला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी गुळाचे पाणी शिवलिंगावर अर्पण केल्याने सूर्य दोष दूर होण्यास मदत होते. त्याचसोबत मानसिक तणाव देखील दूर होतो. हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यानंतर चांगले कपडे परिधान करुन शिवलिंगावर बेलपत्र आणि पाणी अर्पण करावे. याशिवाय गुळाचे तुकडे देखील शिवलिंगावर अर्पण करावे.
असे म्हटले जाते की, महादेवाचे आशीर्वाद मिळविण्यासाठी शिवलिंगावर काही गोष्टी अर्पण केल्या जातात. त्यापैकी शिवलिंगावर गूळ अर्पण करणे शुभ मानले जाते. श्रावण महिन्यात शिवलिंगावर गूळ अर्पण करणे शुभ मानले जाते. हे पाणी उसाच्या रसासोबत देखील अर्पण करु शकतात. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शिव आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे व्यक्तीला आर्थिक लाभ, संपत्ती मिळणे यांसारख्या गोष्टींचा लाभ देखील होतो. रविवारी शिवलिंगावर गूळ अर्पण केल्यास काय होतो, जाणून घ्या
शिवलिंगावर गुळाचे पाणी अर्पण करणे शुभ मानले जाते. ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात सुख, समृद्धी आणि कल्याण प्राप्त होते. जर व्यक्तीने गुळाचे पाणी अर्पण केल्याने त्याच्या जीवनात अनेक चमत्करिक फायदे होताना दिसून येतात. त्याचससोबत हा उपाय केल्यास धन आणि समृद्धी येते. त्याचप्रमाणे व्यक्तीच्या कुटुंबामध्ये सुख, शांती आणि गोडवा टिकून राहतो.
मान्यतेनुसार, शिवलिंगावर गुळाचे पाणी अर्पण केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि संपत्तीमध्ये वाढ होते. पण हा उपाय श्रावण महिन्यातील रविवारी केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. त्याचसोबत पैशांच्या संबंधित समस्या दूर होतील.
धार्मिक श्रद्धेनुसार, शिवलिंगावर गूळ किंवा गुळाचे पाणी अर्पण केल्याने महादेवाचे आशीर्वाद प्राप्त होतात. यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये येणाऱ्या इच्छित लाभ मिळतात. त्याचप्रमाणे अपेक्षित यश मिळतात.
जर श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावर गुळाचे पाणी अर्पण केल्याने व्यक्तीच्या परिवारामध्ये आनंद, शांती आणि समृद्धी टिकून राहते, असे म्हटले जाते. त्याचसोबत घरामध्ये होणारे वादविवाद दूर होतात. तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम, सुसंवाद वाढण्यास मदत होते.
धार्मिक मान्यतेनुसार, शिवलिंगावर गुळाचे पाणी अर्पण केल्याने त्या व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याचबरोबर ज्या व्यक्तीला जुने आजार असतील तर ते दूर होतील आणि शत्रूंपासूनही मुक्तता मिळते, अशी मान्यता आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)