फोटो सौजन्य- pinterest
आज 20 जुलै रोजी चंद्र ग्रहाने वृषभ राशीमध्ये संक्रमण केले आहे. त्याआधी तो मेष राशीमध्ये होता. या संक्रमणाचा परिणाम काही राशीच्या लोकांवर अशुभ होऊ शकतो.
चंद्र देवाने आज सकाळी 6.11 वाजता वृषभ राशीत प्रवेश केला आहे याआधी तो मेष राशीमध्ये स्थित होता. पण आता तो 22 जुलैपर्यंत वृषभ राशीमध्ये राहणार आहे. दरम्यान या काळामध्ये चंद्र आपले दोन ते तीन वेळा नक्षत्रात बदल करेल. जेव्हा चंद्र आपली राशी बदलतो त्यावेळी प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनात बदल होताना दिसून येतात. ग्रह नक्षत्रांच्या हालचालीचा शुभ अशुभ परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांवर होताना दिसून येतो.
जर एखादी व्यक्ती चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्या व्यक्तीला योग्य मार्गावर आणले जाते. या लोकांची मानसिक स्थिती चांगली राहते. तसेच तुमच्या आर्थिक स्थितीवर देखील त्याचा परिणाम होईल. चंद्राच्या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना अशुभ परिणामांना सामोरे जावे लागणार आहे जाणून घ्या
बऱ्याच काळानंतर चंद्र देव आज वृषभ राशीत संक्रमण करत आहे त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी हे शुभ राहणार आहे. कुटुंबामध्ये शांत वातावरण राहील. या काळात वृद्धांना मानसिक शांती मिळेल. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळू शकतात. हे लोक सोने खरेदी करु शकतात. या काळामध्ये तुमचे आरोग्य चांगले राहील. तसेच तुम्ही धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकतात.
चंद्राची आवडती रास कर्क असल्याने या राशीच्या लोकांना हे संक्रमण चांगले राहील. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने घरात शांततेचे वातावरण राहील. जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना जुलैच्या शेवटी आनंदाची बातमी मिळेल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे त्यांना यश मिळेल. व्यवसायाचा विस्तार होईल आणि नफा वाढेल.
धनु राशीच्या लोकांना चंद्राच्या कृपेने कुटुंबातील सदस्यांमधील असलेले मतभेद दूर होतील. परस्पर समन्वय चांगले राहतील. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष्य वेळेवर पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा केली जाईल. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना इच्छित ठिकाणी बदली मिळू शकते. वृद्धांचा मानसिक ताण कमी होईल आणि जीवनात स्थिरता येईल. तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत राहू शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)