
वड आणि औंदुबरबाबत एक पुराणकथा सांगितली जाते. असं म्हटलं जातं की, एके काळी भगवान दत्तात्रेय पृथ्वीवर भ्रमंती करत होते. ते जिथे जिथे जायचे तिथे त्यांना पाहण्यासाठी साधक, ऋषी, भक्त जमायचे. मात्र दत्तात्रेय नेहमी वृक्षांच्या सावलीत ध्यान करायला बसायचे—विशेषतः वड आणि औदुंबर झाडाखाली ते कायम ध्यानस्त असायचे.त्या वेळी या दोन्ही वृक्षांनी दत्तांकडे एक याचिका केली “ते म्हणाले प्रभू, आम्ही विशाल असूनही केवळ उभेच आहोत. आपल्या साधनेचा, आपल्या चैतन्याचा स्पर्श आम्हाला कधी मिळेल?”भगवान दत्तात्रेय त्यांच्या भक्तवत्सल स्वभावामुळे या वृक्षांवर अत्यंत प्रसन्न झाले. प्रथम वड वृक्षाला आशीर्वाद देत म्हणाले, “तू पृथ्वीवर स्थैर्य, शक्ती आणि अक्षयत्वाचे प्रतीक म्हणून पूजला जाशील. साधक तुझ्या सावलीत ध्यान केल्यास त्याच्या मनातील भीती व चंचलता नाहीशी होईल; त्याला धैर्य व दृढता प्राप्त होईल.” यामुळे वड दत्तसंप्रदायात स्थैर्य व सामर्थ्याचे चिन्ह मानले गेले.
यानंतर दत्तांनी औदुंबर वृक्षाकडे पाहून त्याला म्हणाले, “तू माझ्या करुणा, दया आणि चैतन्याचे रूप होशील. जो भक्त तुझ्या पायाशी मनापासून प्रार्थना करेल त्याचे मानसिक दुःख दूर होईल, आणि तुझ्या छायेत जप करणाऱ्यावर माझी विशेष कृपा राहील.” यामुळे औदुंबराला दत्ताचे निवासस्थान मानले जाते.ही कथा सांगते की वड म्हणजे शक्ती व स्थैर्य, तर औदुंबर म्हणजे चैतन्य व करुणा. त्यामुळे आजही दत्तसंप्रदायात ही दोन्ही झाडे भक्तीसाठी अत्यंत पवित्र मानली जातात.
वड आणि औदुंबर या दोन्ही वृक्षांना दत्तसंप्रदायात फक्त पुराणकथेमुळे नव्हे, तर शास्त्रीय कारणांमुळेही विशेष स्थान आहे. खरंतर अध्यात्म आणि विज्ञान याचा संगम दत्तसंप्रदायात दिसून येतो. वड आणि औंदुबर ही वृक्ष दिर्घकाळ जगणारी आहेत. शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिलं तर वडाचं झाडं मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करतं. वडाच्या झाडाखाली ध्यानस्त बसल्याने श्वसनासंबंधित आजार दूर होतात. बहुगुणी असं वडाचं झाडाचे औषधी गुणधर्म जास्त आहेत.
औदुंबर फळे, पानं, फुले, साल या सर्वांमध्ये औषधी घटक आढळता. पोटाचे विकार,मानसिक तणाव, रक्तदाब नियंत्रण इतकंच नाही तर त्वचा रोगावर औदुंबर अत्यंत परिणामकारक मानला जातो. त्याचबरोबर औंदुबर आणि वडाच्या झाडाखाली पाण्याचे साठे मोठ्या प्रमाणात असतात. या झाडांमुळे मातीची धूप रोखली जाते. यामुळे अशा बहुगुणी झाडांचं आपल्या आयुष्य़ात महत्व जास्त आहे. यांचे आभार मानण्यासाठी आणि त्याचं महत्व समजावं म्हणून दत्तसंप्रदायात या दोन्ही झाडांचा परमेश्वराचा अंश मानला जातो.
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त !
Ans: वड स्थैर्य, शक्ती आणि अखंडता दर्शवतो, तर औदुंबर करुणा, चैतन्य आणि कृपा दर्शवतो. भगवान दत्तात्रेयांनी या दोन्ही वृक्षांना आशीर्वाद दिल्यामुळे त्यांना दत्ताचे स्वरूप मानले जाते.
Ans: वडाच्या झाडाखाली बसल्याने मन स्थिर होतं, भीती आणि चंचलता कमी होते. वड मोठ्या प्रमाणात शुद्ध हवा निर्माण करतो त्यामुळे मानसिक शांतताही मिळते.
Ans: अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ मठाभोवती असलेला वड वृक्ष ‘स्मरणगामी’ शक्तीचे प्रतीक मानला जातो. स्वामींच्या चैतन्याशी जोडणारा हा परंपरेचा भाग आहे.