दत्तगुरुंचे तीन अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंहसरस्वती आणि श्री स्वामी समर्थ. दत्तगुरुंना मानणारा त्यांना पुजणारा अनुयायी वर्ग खूप मोठा आहे. याच दत्तसंप्रदायाचा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे नवनाथ. दत्तसंप्रदायात नवनाथ म्हणजे अध्यात्म, योग, आणि दत्ततत्त्व यांचं मूर्त स्वरूप मानलं जातं. “नवनाथ” म्हणजे भगवान दत्तात्रेयांच्या नऊ प्रमुख अवतार स्वरूपात अवतरलेले महान योगी. हे नवनाथ दत्तसंप्रदायाचे आधारस्तंभ मानले जातात. त्यांनी जगभर दैवी ज्ञान, भक्ति, आणि योगमार्गाचा प्रसार केला. या नवनाथांचं दत्तसंप्रदायातील महत्व काय ते आज जाणून घेऊयात.
हिंदू धर्मातील आख्य़ायिकेनुसार, दत्तगुरु हे त्रिदेवांचे म्हणजेच ब्रह्मा, विष्णु, महेश यांचा अंश आहेत. तीनही देवांच एकत्रित तत्त्व दत्तगुरुंमध्ये आहे. त्यांनी अध्यात्मिक मार्गाने मानवी जीवनाला योग्य दिशा दाखवण्यासाठी विविध रूपं घेतली. नवनाथ हे त्या दत्ततत्त्वाचा एक भाग आहे.
मच्छिंद्रनाथ
गोरक्षनाथ
जलंधरनाथ
कानिफनाथ
घुग्गनाथ
चरपटीनाथ
रीवणनाथ
नागनाथ
भारद्वाजनाथ हे सर्व नाथ भगवान दत्तात्रेयांचे शिष्य व त्यांच्याच तेजातून उत्पन्न झालेलं दिव्य तत्त्व आहेत.
दत्तसंप्रदायाचा खरा पाया रचला, तो या नवनाथांनी असं म्हटलं जातं. जो नंतर महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि नेपाळपर्यंत पसरला.
नवनाथ परंपरेतूनच नंतर नाथसंप्रदाय आणि अवधूत परंपरा विकसित झाली असं देखील सांगितलं जातं. नवनाथांनी
समाजातील सर्व घटकांना स्त्री, शूद्र, गरीब असा कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला भक्तीमार्ग स्विकारण्याता अधिकार आहे, परमार्थ हा ईश्वर आणि ईश्वारापुढे उच्च निच्च असं काही राहत नाही ही शिकवण नवनाथांनी दिली. परमार्थातून भक्तीमार्ग मिळतो त्यामुळे आपले कर्म चांगले ठेवा हे त्यांनी सांगितलं. नवनाथ म्हणजे केवळ संत नाहीत, ते दत्ततत्त्वाचे विस्तार आहेत. त्यांनी अध्यात्माला लोकजीवनाशी जोडून प्रत्येकाला परमेश्वराशी एकरूप होण्याचा मार्ग दाखवला. म्हणूनच दत्तसंप्रदायात नवनाथांचं स्थान गुरुतुल्य आणि पूजनीय मानलं जातं.
“नवनाथ” म्हणजे नऊ नाथ गुरू किंवा आध्यात्मिक अध्यात्मज्ञ, ज्यांच्यावर नवनाथ संप्रदायाची परंपरा आधारित आहे. या नवनाथांचा संबंध नाथ संप्रदायाशी आहे, जो योग, तंत्र, साधना यांचा समन्वय असलेली परंपरा आहे. परंपरेनुसार, या नवनाथांचे आद्य गुरु म्हणजे दत्तात्रेय ज्यांना त्रिदेव (ब्रह्मा, विष्णु, महेश) यांच्या एकात्म स्वरूपाचे अवतार मानले जाते.
नवनाथ परंपरेतील शिक्षण हे योग, तंत्र आणि गूढ साधनेवर आधारित आहे. हे दत्तसंप्रदायाच्या भक्ती आणि ज्ञानपरंपरेत एक पूरक घटक आहेत. म्हणजेच, दत्तसंप्रदायात भक्तीचे महत्व जसे आहे, तसे नवनाथ परंपरेत योग, ज्ञान, गुरुशिष्य परंपरा या गुणवत्ता अतिशय महत्वाच्या ठरतात.
सम्प्रदायांचा संबंध
नाथ परंपरा ही खरोखरच एक स्वतंत्र योग / सिद्ध परंपरा आहे, पण इतिहासातील अनेक टप्प्यांवर दत्तसंप्रदायाशी (विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक इत्यादी भागात) धार्मिक-सांस्कृतिक घनिष्ठ संबंध निर्माण झाला आहे. दत्तसंप्रदायातील या नऊ नाथांनी अध्यात्मिक मार्गाने मानवी जीवनाला नवी दिशा दिली.