
फोटो सौजन्य- pinterest
श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तसंप्रदायातील महान अवतार मानले जातात. त्यामुळे भक्तांच्या जीवनातील दुःख दूर होतात, अडचणींचा नाश होतो आणि सुख-समृद्धी प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. गुरुवारचा दिवस हा स्वामींना समर्पित असल्याचे मानले जाते. अनेकजण स्वामींना गुरु म्हणून पूजतात. स्वामी नेहमी आपल्या भक्तांना सांगतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये गुरु ग्रहाचा संबंध स्वामींशी जोडलेला आहे. गुरूला ज्ञान,भाग्य आणि शिक्षणाचा कारक मानले जाते. ज्या व्यक्तीच्या पाठीमागे गुरुचे पाठबळ असते त्या व्यक्तीची जीवनामध्ये नेहमी प्रगती होते आणि त्यांचे भक्तांवर कायम आशीर्वाद राहतात. स्वामी समर्थाच्या आवडत्या राशी कोणत्या आहेत त्या जाणून घ्या
कर्क राशीमध्ये गुरुचे स्थान हे उच्च स्थानी असते. त्यामुळे तो प्रभावी आणि शक्तिशाली बनतो. याचा फायदा कर्क राशीच्या लोकांना सर्वाधिक होतो. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांवर स्वामींची नेहमी कृपा आशीर्वाद राहतात. या राशीचे लोक भावनिक, संवेदनशील आणि कुटुंबवत्सल असतात. या लोकांना घरगुती सुख, मानसिक शांती आणि आर्थिक स्थैर्य लाभते. तसेच अशा लोकांना संकटाच्या काळात योग्य मार्गदर्शनदेखील मिळते. त्यासोबतच आर्थिक स्थिती देखील चांगली राहते.
सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. सूर्य आणि गुरुमुळे या राशीच्या लोकांवर स्वामीची विशेष कृपा असते, असे म्हटले जाते. करिअरच्या बाबतीत या राशीच्या लोकांवर स्वामींचा आशीर्वाद असतो. यामुळे तुम्हाला जीवनामध्ये अपेक्षित यश मिळते. स्वामींच्या आशीर्वादाने ज्या क्षेत्रात तुम्ही कार्यरत आहात त्यात तुम्ही तुमचा उत्तमरित्या ठसा उमटविता. आर्थिक बाबतीत तुमची परिस्थिती उत्तम राहणार आहे.
गुरुची स्वतःची रास धनु आहे. या राशीच्या लोकांवर स्वामींचा विशेष आशीर्वाद असतो. हे लोक धर्म, अध्यात्म आणि ज्ञानाकडे ओढलेले असतात. स्वामींच्या आशीर्वादाने या लोकांना प्रत्येक क्षेत्रामध्ये अपेक्षित संधी मिळते, नशिबाची साथ मिळते आणि जीवनामध्ये मोठे निर्णय घेण्यास अपेक्षित यश मिळते.
मीन राशीचे स्वामी गुरु असल्याने या राशीच्या लोकांवर कायम स्वामींचा आशीर्वाद राहतो. या लोकांना प्रत्येक परिस्थितीवर अपेक्षित मार्गदर्शन मिळते. या राशीचे लोक श्रद्धावान, दयाळू आणि आध्यात्मिक प्रवृत्तीचे असतात. या राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये आलेली संकटे लवकर दूर होतात आणि सुख-समृद्धी कायम टिकून राहते. मात्र ही लोक मानसिक ताण घेतात. या राशीच्या लोकांना कायम कुटुंबाची साथ मिळते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तसंप्रदायातील महान अवतार मानले जातात. भक्ती आणि ज्योतिष परंपरेनुसार काही राशींचे गुण स्वामींच्या तत्त्वज्ञानाशी जुळत असल्याने त्यांच्यावर विशेष कृपा असल्याचे मानले जाते.
Ans: मेष, कर्क, कन्या, धनु आणि मीन या राशींवर श्री स्वामी समर्थांची विशेष कृपा असल्याचे मानले जाते.
Ans: नोकरीत पदोन्नती, व्यवसायात वाढ, नवीन संधी, मान-सन्मान आणि आर्थिक प्रगतीचे योग निर्माण होतात