“सब का मालिक एक” हे वाक्य श्री शिर्डी साईबाबांच्या शिकवणीचं सार मानलं जातं. या एका वाक्यात साईबाबांनी देवावर ठेवलेला विश्वास, मानवतेची समानता आणि सर्वधर्मसमभाव ही मोलाची शिकवण दिली. एक काळ असा होता ज्या वेळी जातीवाद, उच्च निच्चतेची वाळवी लागलेली होती. मात्र अध्यात्माच्या मार्गाने साईनाथांनी समाजाला मानवतावाद समजून सांगितला.
शिर्डीत वास्तव्यास असताना साईबाबांनी कधीही हिंदू-मुस्लिम, श्रीमंत-गरीब, उच्च-नीच असा भेद केला नाही. त्यांच्या दारात येणारा प्रत्येक भक्त समान होता. मशिदीत राहूनही त्यांनी राम, कृष्ण, विठ्ठल यांचा जप केला आणि कुराणातील तत्वांचाही सन्मान केला. त्यामुळे “सब का मालिक एक” याचा अर्थ असा होतो की आपण जरी देवाला वेगवेगळ्या नावांनी हाक मारत असलो, तरी तो एकच परमेश्वर आहे.
तुम्ही गणपतीचा मंत्र म्हणा, रामरक्षा म्हणा, हमुमान चालिसा म्हणा किंना कुराण वाचा तुमच्या मनातील शुद्ध भाव हा परमेश्वरापर्यंत पोहचतो. त्यासाठी लागतो तो विश्वास आणि संयम. साईबाबांच्या जीवनात श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टींना विशेष महत्त्व होतं. श्रद्धा म्हणजे ईश्वरावरचा अढळ विश्वास आणि सबुरी म्हणजे संयम. साईबाबा सांगत असत की, संकटं ही तात्पुरती असतात; योग्य वेळी ईश्वर सर्व प्रश्नांची उत्तरं देतो. मात्र त्यासाठी मन शुद्ध, श्रद्धा दृढ आणि आचरण योग्य असणं आवश्यक आहे.
“सब का मालिक एक” ही केवळ धार्मिक शिकवण नाही, तर सामाजिक आणि नैतिक मूल्यांचा आधार आहे. समाजात वाढणारा द्वेष, जातीयता आणि धार्मिक तेढ दूर करण्यासाठी हा विचार आज अधिक महत्त्वाचा ठरतो. सर्व माणसं एका शक्तीचीच निर्मिती आहेत, ही भावना मनात रुजली तर प्रेम, करुणा आणि शांतता आपोआप वाढते.आजही शिर्डीला येणारे लाखो भक्त साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. त्यांच्या विचारांनी प्रेरित होता. जीवनातील दुःख, अडचणी आणि संभ्रम दूर करण्यासाठी “सब का मालिक एक” हा विचार माणसाला कोणत्याही जातीत अडकून न ठेवता परमेश्वराच्या भक्तीत तल्लीन होण्यास सांगतो.
Ans: या वाक्याचा अर्थ असा की या संपूर्ण सृष्टीचा मालक एकच आहे—तो म्हणजे परमेश्वर. आपण देवाला वेगवेगळ्या नावांनी पूजतो, पण अंतिम सत्य एकच आहे.
Ans: हा संदेश कोणत्याही एका धर्मापुरता मर्यादित नाही. तो सर्व धर्मांना समान मानणारा आणि मानवतेला केंद्रस्थानी ठेवणारा विचार आहे.
Ans: आज समाजात वाढणारा द्वेष, धार्मिक तेढ आणि असहिष्णुता कमी करण्यासाठी “सब का मालिक एक” हा विचार अत्यंत उपयुक्त आहे. तो शांतता आणि सलोखा निर्माण करतो.






