Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astrology: शुक्रवारी पौर्णिमेच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, मिळतील लक्ष्मी नारायणाचे आशीर्वाद

श्रावण पौर्णिमेची सुरुवात शुक्रवारी होत आहे त्यामुळे हा दिवस खूप खास समजला जातो. जर या दिवशी तुम्ही काही उपाय केल्यास लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद मिळेल आणि तुमची सर्व दुःख दूर होतील.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 07, 2025 | 03:46 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

शुक्रवारचा दिवस धनाची देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने खूप शुभ परिणाम मिळतात. शुक्रवारचा दिवस खूप खास मानला जातो कारण या दिवशी श्रावण पौर्णिमा आहे. तसेच श्रावण महिन्यातील तिसरा शुक्रवार देखील आहे. जर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी काही उपाय केल्यास तुम्हाला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल. त्याचसोबत तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि संपत्तीमध्ये वाढ होईल. शुक्रवारी पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करायचे, जाणून घ्या

संपत्तीत वाढ करण्यासाठी करा हे उपाय

शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करतात लाल रंगांचे कापड, साडी, हळद, दूर्वा, काही पैसे आणि जिरे या गोष्टी अर्पण कराव्यात. जिऱ्याऐवजी तुम्ही कच्चे तांदूळ देखील अर्पण करू शकता. हा उपाय करणे खूप फायदेशीर ठरेल. दुसऱ्या दिवशी पैसे उचलून तुमच्या तिजोरी किंवा पैसे ठेवण्याच्या जागी ठेवा. त्यामुळे आर्थिक समस्या दूर होतील आणि तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल. जिरे ठेवलेली जागा कधीही रिकामी ठेवू नये त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा राहून घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही.

Budh Margi: बुध ग्रह कर्क राशीमध्ये करणार प्रवेश, या राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत होईल सुधारणा

जीवनात सुख शांती मिळविण्यासाठी करा हे उपाय

शुक्रवारी देवी लक्ष्मी पूजा करताना तिला खिरीचा नैवेद्य दाखवावा. यावेळी शक्य असल्यास खिरीमध्ये थोडे केसर टाकावे. असे केल्याने जीवनातील समस्यांपासून सुटका होते आणि घरामध्ये सुख समृद्धी राहते. मान्यतेनुसार देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवल्याने घरातील समस्या हळूहळू कमी होऊ शकतात. जीवनात यशाचे नवीन मार्ग उघडतात.

या उपायाने तुमच्या सर्व इच्छा होतील पूर्ण

पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी चंद्राला दूध अर्पण करावे. यावेळी चंद्राच्या मंत्रांचा जप करावा. असे केल्याने व्यक्तीच्या वैवाहिक जीवनातील समस्या दूर होण्यास मदत होईल. पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात आणि अडकलेले कामही हळूहळू पूर्ण होऊ लागेल. यामुळे घरगुती त्रासांपासून सुटका होईल.

Raksha Bandhan: रक्षाबंधनाच्या दिवशी 297 वर्षांनंतर घडणार दुर्मिळ योगायोग, या राशीच्या लोकांचे बदलेल नशीब

देवी लक्ष्मी आणि विष्णूंचा आशीर्वाद

शुक्रवारी संध्याकाळी देवी लक्ष्मीची आरती करताना कापूर आणि लवंगाचा वापर करावा. त्यासोबत तुळशीचाही वापर करावा. असे केल्याने कुटुंबातील सदस्यांवर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. तसेच जीवनात प्रगती करण्यासाठी शुक्रवारी देवी लक्ष्मीला गुलाबाचे फूल अर्पण करावे. फूल अर्पण करताना ‘ओम कमले कमलालये प्रसीद प्रसीद’ या मंत्रांचा जप करावा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Shukrawar upay shravan purnima 2025 blessings of lakshmi narayan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2025 | 03:46 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

zodiac sign: अनाफा आणि वेशी योगाचा मेष आणि तूळ राशीसह या राशींच्या लोकांना होणार फायदा
1

zodiac sign: अनाफा आणि वेशी योगाचा मेष आणि तूळ राशीसह या राशींच्या लोकांना होणार फायदा

Numberlogy: मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Mars Transit: मंगळ मीन राशीत पावणार उदय, या राशींच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी
3

Mars Transit: मंगळ मीन राशीत पावणार उदय, या राशींच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी

Sant Surdas: कोण आहे संत सूरदास, जाणून घ्या सूरदासांचा अध्यात्मिक प्रवास
4

Sant Surdas: कोण आहे संत सूरदास, जाणून घ्या सूरदासांचा अध्यात्मिक प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.