फोटो सौजन्य- pinterest
बुध ग्रहाला बुद्धिमत्ता आणि व्यवसायाचा कारक मानला जातो. बुध ग्रहाचा अधिपती सोमवार, 11 ऑगस्ट रोजी कर्क राशीमधून बदलणार आहे. तर 22 जून रोजी बुध कर्क राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रह 11 ऑगस्ट रोजी दुपारी 12.59 वाजता कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे.
बुध ग्रहाने कर्क राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर 30 ऑगस्ट रोजी सिंह राशीमध्ये संक्रमण करणार आहे. कर्क राशीमध्ये बुध गेल्याने त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होऊ शकतो. कोणत्या राशीच्या लोकांवर बुध ग्रहाच्या संक्रमणाचा परिणाम होणार आहे, जाणून घ्या
बुध कर्क राशीत प्रवेश करत असल्याने मिथुन राशीच्या लोकांना पैसे कमविण्याच्या अधिक संधी मिळतील. या काळात मिथुन राशीचे लोक पैसे वाचवू शकतात. यावेळी तुमच्या कुटुंबाकडे अधिक लक्ष द्याल. नोकरी होणाऱ्या बदलांमुळे तुम्ही आनंदीत राहाल. व्यवसायामध्ये तुम्हाला तुमचे लक्ष केंद्रित करावे लागेल. तसेच केलेल्या प्रयत्नांमुळे तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
बुध कर्क राशीत प्रवेश केल्याने कन्या राशीच्या लोकांना चांगले परिणाम मिळू शकतात. या काळात तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करु शकता. करिअरमध्ये पदोन्नती आणि पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा होऊ शकतो. तुम्ही पैसे वाचवू शकाल जे भविष्यात तुम्हाला फायदेशीर ठरेल.
बुध कर्क राशीत प्रवेश केल्याने तूळ राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. या काळात तुम्ही धार्मिक यात्रेला जाऊ शकता. नोकरी आणि करिअरमध्ये तुम्हाला अनेक नवीन संधी मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ राहील. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
बुध कर्क राशीत प्रवेश केल्याने मकर राशीच्या लोकांना फायदा होईल. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. मित्रांकडून मिळणारा पाठिंबा तुम्हाला पुढे घेऊन जाईल. व्यवसायामध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल. तुम्ही एखाद्या योजनेत गुंतवणूक करु शकता त्यातून तुम्हाला भविष्यात चांगला फायदा होईल.
बुध कर्क राशीत प्रवेश केल्याने कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर राहील. या काळात त्यांना वडिलोपार्जित मालमत्तेचा लाभ मिळू शकतो. करिअरमध्ये पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल. त्यातून तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)