फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी काही योगायोग घडणार आहेत त्या शुभ मानल्या जातात. यावेळी रक्षाबंधन 9 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी 297 वर्षांनी एक शुभ योगायोग घडणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये हे योग खूप शुभ मानले जातात. या दिवशी सूर्य कर्क राशीमध्ये, गुरु आणि शुक्र मिथुन राशीमध्ये, राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत असणार आहे.
यावेळी रक्षाबंधन 9 ऑगस्ट रोजी आहे. हा शुभ योग श्रावण पौर्णिमेच्या दिवशी तयार होणार आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी, पौर्णिमेच्या तिथीसह, श्रावण नक्षत्र, सर्वार्थ सिद्धी योग, सौभाग्य योग असेल आणि चंद्र मकर राशीत असल्याने जो एक अतिशय शुभ संयोग आहे. त्याचा प्रभाव तीन राशींवर सकारात्मक पडेल, त्या राशी म्हणजे तूळ, मकर, कुंभ आणि मीन या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहील. रक्षाबंधनाच्या दिवशी शुभ योगामुळे कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
रक्षाबंधनाच्या दिवशी शुभ योगामुळे तूळ राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. या दिवशी तूळ राशीच्या लोकांचे नशीब चमकू शकते. तसेच तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायामध्ये नवीन दिशा मिळेल. पदोन्नती होऊ शकते.
मकर राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनाचा दिवस खूप फायदेशीर राहणार आहे. या राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळ सुरू होईल. प्रत्येक कामामध्ये तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. व्यवसायामध्ये तुमची प्रगती होईल. तसेच तुम्हाला कुठून तरी अचानक नफा होऊ शकतो. परदेशात नोकरी मिळवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. उत्पन्नाचे स्त्रोत वाढू शकतात. तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात.
कुंभ राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनाचा दिवशी नशीब चमकेल. या दिवशी तुमच्या सर्व समस्या संपू शकता. तुम्हाला करिअरमध्ये यश मिळेल. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता देखील आहे. आर्थिक लाभ होऊ शकतो. काही महत्त्वाचे काम पूर्ण होईल आणि शारीरिक वेदना संपतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
रक्षाबंधनाचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी सकारात्मक परिणाम देणारा राहील. यावेळी तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. या काळात तु्मच्या घरात कोणतेही शुभ कार्याचे आयोजन केले जाऊ शकते. व्यवसायामध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)