
फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मात स्कंद षष्ठीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. हा दिवस भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे ज्येष्ठ पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे. हे व्रत दर महिन्याच्या शुद्ध पंधरवड्याच्या सहाव्या दिवशी भक्तिभावाने पाळले जाते. हा सण प्रामुख्याने दक्षिण भारतात साजरा केला जातो, ज्याला मुरुगन किंवा सुब्रमण्य असेही म्हणतात. डिसेंबरमध्ये पौष महिन्यात स्कंद षष्ठी कधी आहे, मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत जाणून घ्या
षष्ठी तिथीची सुरुवात गुरुवार, 25 डिसेंबर रोजी दुपारी 01:42 वाजता होणार आहे आणि त्याची समाप्ती 26 डिसेंबर रोजी सकाळी 1.43 वाजता होणार आहे. यावेळी स्कंद षष्ठीचे व्रत 25 डिसेंबर रोजी पाळले जाणार आहे.
स्कंद षष्ठीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरुन झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे आणि उपवास करण्याचे व्रत घ्या. तुमच्या देव्हाऱ्यात भगवान कार्तिकेय आणि शिव आणि पार्वती यांची मूर्ती किंवा चित्राची स्थापना करावी. कार्तिकेयांना पाणी, दूध आणि पंचामृताने अभिषेक करा. त्यानंतर त्यांना पिवळ्या रंगांचे कपडे, फुले, चंदनाचा लेप आणि धान्य अर्पण करावे. दक्षिण भारतामध्ये भगवान मुरुगनला ‘विभूती’ अर्पण करणेदेखील शुभ मानले जाते. फळे, मिठाई आणि काजूदेखील अर्पण करावे. “ओम तत्पुरुषाय विद्महे महासैन्याय धीमहि तन्नो स्कंद: प्रचोदयात” किंवा “ओम शरवणभवाय नमः” या मंत्रांचा जप करावा. शेवटी तुपाच्या दिव्याने आरती करावी त्यानंतर अनावधानाने झालेल्या चुकांसाठी क्षमा मागावी.
भारताच्या वेगवेगळ्या भागात भगवान कार्तिकेय यांच्याबद्दल वेगवेगळ्या श्रद्धा आहेत. उत्तर भारतामध्ये कार्तिकेयला गणपती बाप्पाचा मोठा भाऊ मानला जातो. तर दक्षिण भारतामध्ये गणपती बाप्पाचा धाकटा भाऊ मानला जातो आणि कुटुंबाचा रक्षक म्हणून त्याची पूजा केली जाते. षष्ठी तिथी भगवान कार्तिकेयाची आवडती तिथी असल्याने तिला कौमारिकी असेही म्हणतात.
जी व्यक्ती स्कंद षष्ठीचे व्रत पाळते त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःखे दूर होतात आणि शत्रूंवर विजय मिळतो. मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदासाठी हे व्रत विशेषतः फायदेशीर मानले जाते. भगवान कार्तिकेय हे देवांचे सेनापती आहेत, म्हणून त्यांची पूजा केल्याने धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो. असे मानले जाते की या दिवशी जे लोक मनापासून पूजा करतात त्यांना शारीरिक आजारांपासून मुक्तता मिळते. उपवास करताना सात्त्विक अन्न खावे आणि ब्रह्मचर्य पाळावे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: स्कंद षष्ठी हा भगवान कार्तिकेय (स्कंद/मुरुगन) यांना समर्पित सण आहे. या दिवशी त्यांच्या शक्ती, पराक्रम आणि विजयाचे स्मरण केले जाते.
Ans: शुभ मुहूर्तात पूजा केल्यास भगवान स्कंदाची विशेष कृपा प्राप्त होते आणि मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते.
Ans: हा दिवस विजय, साहस, आत्मविश्वास आणि अडचणींवर मात करण्याचे प्रतीक आहे. विशेषतः शत्रू बाधा, भय आणि नकारात्मक शक्ती दूर होतात असे मानले जाते.