फोटो सौजन्य- pinterest
पंचांगानुसार यावर्षी शाकंभरी नवरात्रीची सुरुवात 28 डिसेंबरपासून होत आहे आणि या उत्सवाचे समाप्ती 3 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. यावेळी शाकंभरी नवरात्र नऊ दिवस नसून आठ दिवस असणार आहे.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर कलशाची स्थापना करावी जसे आपण चैत्र नवरात्र किंवा शारदीय नवरात्रीत करतो त्या पद्धतीने करावे.
शाकंभरी देवीच्या मूर्तीची स्थापना करावी किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून देवी दुर्गाची प्रतिमा ठेवावी. देवीला लाल रंगांचे वस्त्र अर्पण करून 16 श्रृंगार अर्पण करावा.
देवीला फळ, भाजी आणि मिठाई अर्पण करावी.
शाकंभरी देवीच्या पूजेच्या वेळी ओम ही श्रीं क्ली भगवती शाकंभरी देव्यै नमः या मंत्रांचा 108 वेळा जप करावा.
दुर्गा सप्तमीचे पठण करून आरती करा
या नवरात्रीच्या वेळी गरीब आणि गरजूवंतांना माझी फळ आणि अन्नधान्यांचे दान करावे. यामुळे पैशाची कमतरता दूर होते.
अष्टमी आणि पौर्णिमेच्या दिवशी विशेष हवन आणि पूजा केली जाते. त्यासोबतच पौर्णिमेच्या दिवशी व्रताची समाप्ती होते.
यावेळी सर्व तामासिक गोष्टींपासून दूर राहा.
पृथ्वीवरील दुष्काळ संपवण्यासाठी माझ्या धान्य आणि हिरवळ निर्माण करणाऱ्या देवी शक्तीचे रूप म्हणून शाकंभरी देवीला मानले जाते. म्हणूनच या देवीला वनस्पती पीके आणि पोषणाची देवी असे म्हटले जाते.
देवींच्या प्रतिमांमध्ये हिरवळीने वेढलेले चित्रण केलेले आहे. जे समृद्धी , प्रजनन, क्षमता आणि जीवनाचे प्रतीक आहे. या देवीची पूजा निसर्ग आणि मानवी जीवनातील खोल संबंध प्रतिबिंबित करते काही ठिकाणी ती मोठ्या थाटामाटात आणि उत्साहाने साजरी केली जाते.
ॐ ह्रीं श्रीं क्लीं भगवति माहेश्वरी अन्नपूर्णा स्वाहा
ॐ महानारायण्यै च विदमहे महादुर्गायै धीमहि तन्नो शाकम्भरी: प्रचोदयात्॥
ॐ सर्वाबाधा विनिर्मुक्तो धनधान्य: सुतान्वित:। मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशय:
शाकैः पालितविष्टपा शतदृशा शाकोल्लसद्विग्रहा । शङ्कर्यष्टफलप्रदा भगवती शाकम्भरी पातु माम् ॥
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: शाकंभरी नवरात्रोत्सव हा देवी दुर्गेच्या शाकंभरी रूपाची उपासना करण्यासाठी साजरा केला जाणारा विशेष नवरात्र उत्सव आहे. या नवरात्रात देवी अन्नपूर्णा व पालनकर्ती स्वरूपात पूजिली जाते.
Ans: देवी शाकंभरी या देवी दुर्गेचे एक रूप असून त्या अन्न, धान्य, फळे आणि शाकाहाराची देवी मानल्या जातात. दुष्काळाच्या काळात सृष्टीचे पालन करणाऱ्या देवी म्हणून त्यांची पूजा केली जाते.
Ans: या नवरात्रात देवीला फळे, भाज्या, धान्य आणि हिरव्या पानांची अर्पण केली जाते. विशेषतः अन्नदानाला फार महत्त्व दिले जाते.






