Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील असं तीर्थक्षेत्र, एकच रूप, दोन शक्तींचा संगम; मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगात शिव-शक्ती एकरूप का मानले जातात?

चार धाम यात्रा असो बारा ज्योतिर्लिंग हिंदू धर्मात आणि शिवभक्त या तीर्थस्थानांना सर्वात जास्त महत्व देतात. महादेवांच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणजे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 05, 2026 | 06:32 PM
Mallikarjuna Jyotirlinga

Mallikarjuna Jyotirlinga

Follow Us
Follow Us:
  • भारतातील असं तीर्थक्षेत्र, एकच रूप, दोन शक्तींचा संगम;
  • मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगात शिव-शक्ती एकरूप का मानले जातात? पौराणिक कथा काय सांगते?
Mallikarjuna Jyotirlinga Srisailam Temple: चार धाम यात्रा असो बारा ज्योतिर्लिंग हिंदू धर्मात आणि शिवभक्त या तीर्थस्थानांना सर्वात जास्त महत्व देतात. महादेवांच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणजे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग. आंध्र प्रदेशातील श्रीशैलम पर्वतावर वसलेल्या मल्लिकार्जुन मंदिराविषयी महत्व जाणून घेऊयात. दक्षिण भारतातील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे भगवान शिवाला समर्पित असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात पवित्र मानले जाते. हे मंदिर श्रीशैलममध्ये, नल्लामाला टेकड्यांमध्ये, कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. येथे भगवान शिव मल्लिकार्जुन आणि देवी पार्वती भ्रामरंबा रूपात विराजमान आहेत. जगातील केवळ तीन मंदिरांपैकी हे एक आहे, जिथे ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठ दोन्ही एकाच ठिकाणी आहेत. असं म्हटलं जातं की, याच ठिकाणी सतीचा ओठाचा भाग पडला होता.

Lakshmi narayan rajyog 2026:  लक्ष्मी नारायण राजयोगामुळे नशिब पालटणार ; मे संपताच ‘या’ तीन राशींना मिळणार पैसाच पैसा

मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे धार्मिक महत्त्व
मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाला विशेष महत्त्व आहे, कारण येथे शिव आणि शक्ती या दोघांची एकाच वेळी उपासना करण्याचे पुण्य लाभते. असा विश्वास आहे की, या स्थळाला भेट दिल्याने भक्तांचे सर्व दुःख दूर होतात आणि त्यांना मोक्षप्राप्ती होते. हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक, तसेच देवी सतीच्या 18 महाशक्तीपीठांपैकी एक आहे. याला ‘दक्षिणेचे कैलास’ म्हणूनही ओळखले जाते, जिथे शिव (मल्लिकार्जुन) आणि पार्वती (भ्रमरंबा) एकत्र वास करतात. आख्यायिकेनुसार, भगवान शिव आणि देवी पार्वती आपला पुत्र कार्तिकेय याच्या जन्माचा उत्सव साजरा करण्यासाठी येथे आले होते. त्यामुळे, हे स्थान कौटुंबिक सुख आणि शांतीचे प्रतीक म्हणूनही मानले जाते.

मंदिराचा इतिहास
मल्लिकार्जुन मंदिर हजारो वर्षे जुने असल्याचे मानले जाते. अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आणि पुराणांमध्ये याचा उल्लेख आढळतो.सातवाहन घराणे, विजयनगर साम्राज्य आणि काकतीय घराणे यांसारख्या विविध राजवंशांनी या मंदिराची उभारणी व विस्तार केला. मंदिराची वास्तुकला द्रविड शैलीचा एक उत्कृष्ट नमुना मानली जाते.

Apara Ekadashi 2026 : अपरा एकादशी म्हणजे काय ? हिंदू धर्मात या दिवसाला इतकं महत्व का आहे ?

काय आहे पौराणिक कथा ?

जेव्हा कार्तिकेय आणि गणेश यांच्यात प्रथम विवाहासाठी शर्यत लागली, तेव्हा कार्तिकेय नाराज होऊन क्रौंच पर्वतावर (श्रीशैलम) निघून गेले.कार्तिकेय रागावून निघून गेल्याचे समजल्यावर शिव आणि पार्वती खूप दुःखी झाले आणि त्यांनी कार्तिकेयच्या मागे क्रौंच पर्वतावर जाण्याचा निर्णय घेतला. तिथे शिव आणि पार्वती आपल्या पुत्राला समजावण्यासाठी आणि त्याच्यासोबत राहण्यासाठी स्थायिक झाले. अशी कथा सांगण्यात येते.

मल्लिकार्जुन मंदिरात कसे पोहोचावे ? 
मंदिराच्या सर्वात जवळच्या विमानतळाबद्दल बोलायचे झाल्यास, सर्वात जवळचे विमानतळ राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (हैदराबाद) आहे, जे अंदाजे २०० किमी अंतरावर आहे. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन मार्कापूर रोड रेल्वे स्टेशन आहे, जिथून रस्त्याने श्रीशैलमला पोहोचता येते. हैदराबाद, कुर्नूल आणि विजयवाडा येथून नियमित बस सेवा देखील उपलब्ध आहेत.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

 

Web Title: Such a pilgrimage site in india one form confluence of two powers why are shiva and shakti considered to be one in mallikarjuna jyotirlinga

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • hindu religion

संबंधित बातम्या

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध
1

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध

Dream Meaning: स्वप्नात दूध किंवा दही दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रातील अर्थ
2

Dream Meaning: स्वप्नात दूध किंवा दही दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रातील अर्थ

Anant Chaturdashi: भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा का करतात? जाणून घ्या सुशीला-कौंडिन्याची पौराणिक कथा
3

Anant Chaturdashi: भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा का करतात? जाणून घ्या सुशीला-कौंडिन्याची पौराणिक कथा

Navratri 2026: नवरात्रीत रोजचा लूक होणार खास! 9 दिवसांसाठी कोणता रंग निवडायचा? पाहा यादी
4

Navratri 2026: नवरात्रीत रोजचा लूक होणार खास! 9 दिवसांसाठी कोणता रंग निवडायचा? पाहा यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.